शहरं
Join us  
Trending Stories
1
मेट्रोच्या भुयारी मार्गाचे लोकार्पण नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन होणार, नवीन तारीख घोषित
2
शेतकरी नेते रविकांत तुपकरांना पोलिसांकडून अटक, आंदोलन सुरू असतानाच कारवाई
3
हिजबुल्लाहला आणखी एक धक्का, हवाई हल्ल्यात ड्रोन कमांडर ठार, इस्रायलचा दावा
4
मराठा आरक्षणासाठी पती- पत्नीने घेतले विषारी द्रव, प्रकृती चिंताजनक 
5
माझे काम पाहून धीरुभाई अन् टाटाही चकीत झाले; नितीन गडकरींनी सांगितला तो किस्सा...
6
साताऱ्यात काँग्रेसला हवा माण, वाई अन् कऱ्हाड दक्षिण मतदारसंघ
7
छगन भुजबळांची प्रकृती बिघडली, हॉस्पिटलमध्ये दाखल; पुण्यातून विशेष विमानाने मुंबईत आणलं
8
परिवर्तन महाशक्तीच्या नेत्यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट, प्रकृतीची केली विचारपूस
9
अक्षय शिंदेचा मृतदेह ठाण्यात दफन करण्यास मनसेचा विरोध, कळवा पोलिसांना दिलं पत्र
10
देशातील पहिली एअर ट्रेन दिल्लीत सुरू होणार; जगातील कोणत्या देशांमध्ये आहे 'ही' सुविधा?
11
मनोजराव कोणालाही भेटायचे नाही, तब्यतेची काळजी घ्या; संभाजीराजेंचा मनोज जरांगे यांना सल्ला
12
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे पंतप्रधान मोदींनी फोन करून केले अभिनंदन
13
विधानसभा निवडणुकीत अजित पवार गट किती जागा जिंकणार? NCP चा इंटरनल सर्व्हे सर्वांनाच चकित करणारा!
14
264 धावा नव्हे...; रोहित शर्माच्या नावावर याहूनही एक मोठा विक्रम! मोडणे एखाद्या स्वप्नासारखे
15
बक्षिसाची रक्कम पोलीस कल्याण निधीत जमा करा, 'त्या' पोलिसांची मनसेला विनंती
16
चीनच्या नव्या अस्त्रामुळे जग चिंतेत, ही क्षेपणास्त्रंसुद्धा क्षणार्धात करू शकतात कुठलंही शहर नष्ट
17
"भाजपचे सरकार आल्यास PoK जम्मू-काश्मीरमध्ये सामील होईल", योगी आदित्यनाथ यांचे जनतेला आश्वासन
18
आता सीबीआयला तपासासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार, कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय
19
धक्कादायक! सासूचा रुग्णालयात मृत्यू; जावयाने मृतदेह घेऊन गाठली बँक, केली पैशांची मागणी...
20
"मोदी खूप शक्तिशाली आहेत, अमाप पैसा आहे, पण...", अरविंद केजरीवालांचा निशाणा

लग्नाला जाणे पडले महागात; चोरट्यांनी साधला डाव, ५० तोळ्यांच्या दागिन्यांसह रोख रक्कम लंपास

By सुरेंद्र राऊत | Published: December 15, 2022 6:16 PM

उमरखेडमध्ये ३३ लाखांची घरफोडी, बसस्थानकासमोरच चोरट्यांनी साधला डाव

उमरखेड (यवतमाळ) : घरात मुलीचे लग्न ठरल्याने आई-वडिलांनी तिच्यासाठी मोठ्या कष्टाने एकएक दागिना तयार केला. घराचा लग्नसोहळा काही दिवसांवर येऊन ठेपला. त्यामुळे दाग-दागिने व इतरही ऐवज याचीही जुळवाजुळव सुरू होती. नात्यातील लग्न सोहळ्याला माहूर येथे गेलेल्या या कुटुंबावर मोठा आघात झाला. १३ डिसेंबरच्या रात्री चोरट्यांनी डाव साधला. रोख रकमेसह ३२ लाख ४० हजारांंचा मुद्देमाल चोरट्यांनी उडविला. ही घटना १४ डिसेंबरच्या सायंकाळी उघडकीस आली.

येथील बसस्थानकासमोर कैलास शिंदे यांचे घर आहे. ते मंगळवारी लग्नकार्यासाठी परिवारासह माहूर येथे गेले होते. बुधवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास ते घरी परतले. त्यांंना घराचे दार व कुलूप सुस्थितीत दिसले. आत प्रवेश केल्यानंतर बेडरूममधील दृश्य पाहून शिंदे दाम्पत्यांना धक्काच बसला. कपाटं फुटलेली होती.

साहित्य अस्ताव्यस्त फेकले होते. मुलीच्या लग्नासाठी आणलेले ५० तोळे सोन्याचे दागिने, अडीच किलो चांदीचे दागिने, रोख ८० हजार हा ऐवज दिसत नव्हता. हे पाहून कैलास हरिभाऊ शिंदे यांच्या पत्नीला भोवळ आली. नेमके काय झाले हे समजले नाही. पत्नीला सावरत शिंदे यांनी आपबिती आपल्या पुतण्यांना सांगितली. ते घटनास्थळी पोहोचले. त्यांनी काका-काकू दोघांनाही धीर देत बाहेर आणले. नंतर या घटनेची माहिती उमरखेड पोलिसांना देण्यात आली. तत्काळ पोलिस घटनास्थळी पोहोचले. चोरीचा प्रकार कसा झाला, याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. चोरीच्या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.सीसीटीव्ही फुटेजवर लक्ष 

घटनास्थळावर श्वान पथक, ठसेतज्ज्ञ यांच्यासह सायबर सेललाही पाचारण करण्यात आले आहे. सर्वप्रथम पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचा शोध घेतला जात आहे. आरोपी किती, कसे आले, यावरून गुन्हा उघडकीस आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. शहरासह जिल्ह्यात चोरीच्या घटना वाढल्या आहेत. यवतमाळ शहरात तीन दिवसांपूर्वी २७ लाखांची घरफोडी झाली. यातीलही आरोपी अजून हाती लागलेेले नाहीत. यापूर्वीच्या अनेक चोऱ्या अनडिटेक्ट आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीtheftचोरीYavatmalयवतमाळ