यवतमाळ : वाढती महागाई, बेरोजगारीने प्रत्येक जण त्रस्त आहे. जगात तग धरण्यासाठी प्रत्येकाचा संघर्ष सुरू आहे. मात्र जगण्यासाठी प्रत्येकी नेमका किती खर्च केला जातोय, याची आकडेवारी केंद्र सरकारने एका सर्वेक्षणाच्या माध्यमातून पुढे आणली आहे.
यानुसार भारतात ग्रामीण क्षेत्रातील एका माणसाचा दरमहा सरासरी उपभोग खर्च फक्त ३ हजार ७७३ रुपये आहे. तर शहरी क्षेत्रात हीच सरासरी ६ हजार ४५९ रुपये आहे. गंभीर म्हणजे, खाद्यान्नापेक्षा चैनीच्या वस्तू आणि वाहतुकीच्या गरजांवरच अधिक खर्च हाेत आहे.