ज्ञानेश्वर मुंदे ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : तालुक्यातील पिंपरी बुटी येथील किती शेतकरी कर्जमाफीच्या यादीत आहेत, असा सवाल खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी येथे घेतलेल्या आढावा बैठकीत केला. तेव्हा प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली. १८ आॅक्टोबर रोजी पालकमंत्र्यांच्या हस्ते यवतमाळात वितरित करण्यात आलेल्या कर्जमाफी प्रमाणपत्रात पिंपरी बुटीच काय, यवतमाळ तालुक्यातील एकाही शेतकºयाचा समावेश नसल्याचे पुढे आले. मुख्यमंत्र्यांनी दोन वर्षांपूर्वी याच गावात एका शेतकºयाच्या घरी मुक्काम केला होता, हे विशेष !मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३ मार्च २०१५ रोजी यवतमाळ तालुक्यातील पिंपरी बुटी येथील विष्णू रंगराव ढुमणे या शेतकºयाच्या घरी मुक्काम केला होता. शेतकºयासोबत भोजन करून शेतकºयाचे जीवनमान जवळून अनुभवले होते. त्याच पिंपरी बुटीतील किती शेतकºयांची नावे कर्जमाफीच्या यादीत आहेत, याची उत्सुकता मुख्यमंत्र्यांना असावी. त्यामुळेच त्यांनी कीटकनाशक फवारणीबाधित शेतकºयांच्या प्रश्नांवर आयोजित आढावा बैठकीत आवर्जून पिंपरी बुटीची माहिती घेतली. आपण भेट दिलेल्या गावातील एखाद्या शेतकºयाला प्रशासनाने निश्चितच प्रमाणपत्र दिले असेल, असे त्यांना वाटले. परंतु या बैठकीत त्यांनी जेव्हा पिंपरी बुटीतील कर्जमाफीचा मुद्दा उपस्थित केला तेव्हा प्रशासनाकडे उत्तरच नव्हते.२९ शेतकºयांना १८ आॅक्टोबर रोजी पालकमंत्री मदन येरावार यांच्या हस्ते कर्जमाफी प्रमाणपत्र एका सोहळ्यात वितरित करण्यात आले. या २९ शेतकºयांमध्ये पिंपरी बुटी येथील एकही शेतकरी नाही. विशेष म्हणजे, या यादीत यवतमाळ तालुक्यातील शेतकºयांचाही समावेश नाही. उलट १५ तालुक्यातील प्रत्येकी दोन गावातील शेतकºयांचा समावेश आहे. २९ शेतकºयांना २४ लाख ९२ हजार १६८ रुपयांची कर्जमाफी झाल्याचे प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. यवतमाळ तालुक्यातील शेतकºयांचा समावेश का टाळला, याचे उत्तर कुणाकडेही नव्हते.पिंपरीत २१६ पात्र शेतकरीशासनाने घोषित केलेल्या कर्जमाफीच्या यादीत पिंपरी बुटी येथील २१६ शेतकरी पात्र ठरले आहे. तर १७ शेतकरी अपात्र आणि चालू वर्षाचे २२ शेतकरी अपात्र आहेत. मुख्यमंत्र्यांनी मुक्काम केलेल्या गावातील २१६ पात्र शेतकºयांपैकी एकाही शेतकºयाला सन्मानपूर्वक कर्जमाफीचे प्रमाणपत्र देण्यात आले नाही. मुख्यमंत्र्यांनीच यावर जाब विचारल्याने प्रशासन मात्र चांगलेच गोंधळले होते.
कर्जमाफीच्या यादीत पिंपरी बुटीचे शेतकरी किती?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 10:07 PM
तालुक्यातील पिंपरी बुटी येथील किती शेतकरी कर्जमाफीच्या यादीत आहेत, असा सवाल खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी येथे घेतलेल्या आढावा बैठकीत केला.
ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांचे मुक्कामी गाव : आढावा बैठकीत विचारलेल्या प्रश्नाने प्रशासनाची तारांबळ