शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
4
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
5
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
6
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
7
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
8
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
9
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
10
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
11
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
12
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
13
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
14
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा
15
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
16
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
17
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
18
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
19
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
20
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!

शिक्षकच नाही तर शिकायचे कसे? विद्यार्थी धडकले सीईओंपुढे

By अविनाश साबापुरे | Published: July 17, 2023 9:06 PM

मार्कीच्या मुलांनी जिल्हा परिषदेत दिली धडक

अविनाश साबापुरे, यवतमाळ: जिल्हा परिषद शाळांमध्ये सध्या शिक्षकांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा पडला आहे. झरी तालुक्यातील मार्की बुद्रूक या गावातील शाळेत तर सध्या एकही शिक्षक नाही. त्यामुळे सोमवारी संतप्त पालकांसह विद्यार्थ्यांनी थेट जिल्हा परिषदेत धडक देत वर्ग भरविला. आम्हाला शिक्षक द्या, अशी मागणी करीत या विद्यार्थ्यांनी सीईओ डाॅ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्यापुढे ठिय्या दिला.

झरी तालुक्यातील अनेक शाळांवर गेल्या तीन चार वर्षांपासून शिक्षकांच्या बदल्यांमध्ये अन्याय होत आहे. अनेक शिक्षक या तालुक्यातील दुर्गम गावांमध्ये जाण्यासाठी तयार नाहीत. मार्की बुद्रूक येथे मागील सत्रात पाच शिक्षक होते. परंतु आता पाचही शिक्षकांच्या बदलीमुळे तेथे एकही शिक्षक नाही. तालुक्यातील अनेक शाळेतील शिक्षकांच्या बदलीमुळे शिक्षणाचा खेळखंडोबा झाला आहे. मार्की बुद्रूक येथील शाळा सध्या विनाशिक्षक बनली आहे. बदली प्रक्रिया राबविण्यापूर्वी या शाळेसाठी शिक्षकांची व्यवस्था करायला हवी होती, अशी मागणी यावेळी पालकांनी केली. येथील शिक्षकांच्या बदल्या केल्या, परंतु बदली झालेल्या शिक्षकांच्या जागेवर नवे शिक्षक देण्यात आले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे पालकांनी विद्यार्थ्यांना घेऊन थेट यवतमाळ येथे जिल्हा परिषदेत धडक दिली.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या दालनाबाहेर विद्यार्थ्यांचा वर्ग भरविण्यात आला. त्यानंतर पालकांसोबत सीईओंनी चर्चा करून या प्रश्नावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. परंतु, बदली प्रक्रियेत असा घोळ घालण्यासाठी जबाबदार कोण, त्यांच्यावर कारवाई कोण करणार, असा सवाल यावेळी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे प्रांतीय उपाध्यक्ष अरविंद देशमुख यांनी उपस्थित केला.

टॅग्स :YavatmalयवतमाळEducationशिक्षण