अविनाश साबापुरे।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोनाची लागण झालेल्या माणसांना ‘समाज’ दिसत नाही. ‘आपल्या दुनिये’पासून दुरावलेल्या या रुग्णांना औषधांपेक्षाही पहिली गरज असते मानसिक आधाराची. ती कोण देणार? अर्थातच डॉक्टर. यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ‘कोरोना कक्षा’तील रुग्णांसाठी सध्या डॉक्टर केवळ देवदूतच नव्हेतर ‘घरातले नातेवाईक’ बनले आहेत. या रुग्णांना कोरोनामुक्त करण्यासाठी जीवाचे रान करीत असलेले डॉक्टर प्रसंगी स्वत:च्या कौटुंबिक अडचणींचे दु:ख काळजाच्या एका कोपऱ्यात दाबून हसतमुखाने राबत आहेत.संचारबंदीने २४ तास घरात असलेले नागरिक दिवसरात्र टीव्हीवर कोरोना संकटाच्या बातम्या पाहण्यात व्यग्र आहेत. यवतमाळात चक्क आठ कोरोनाबाधीत रुग्ण सापडले. त्यांना जेथे ठेवले तिकडे सध्या कोणीही फिरकत नाही. तिकडे फिरकणे धोक्याचेही आहे. पण ज्या कोरोना रुग्णांची सावलीही सध्या इतरांना धोकादायक वाटतेय, इतरांनाच कशाला रुग्णांच्या नातेवाईकांनाही भीती वाटते, त्याच कोरोना रुग्णांच्या अवतीभवती सध्या एकच व्यक्ती दिवसरात्र खंबिरपणे वावरतेय... ती म्हणजे डॉक्टर!यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची जुनी इमारत तशी अडगळीत पडलेली. त्याच इमारतीच्या मागील बाजूस असलेल्या ‘इस्पीरेटर मेडिसन’ परिसरातील तीन मजली इमारत ‘कोरोना रुग्ण कक्ष’ बनविण्यात आली आहे. पहिल्या आणि दुसºया मजल्यावर क्वारंटाईन केलेले आणि कोरोना संशयित व्यक्ती ठेवलेले आहे. तर तिसºया मजल्यावर कोरोनाबाधीत रुग्ण आहेत. बाहेर सुरक्षारक्षकांचा कडा पहारा. त्यापुढे पोलीस चौकी. अन् या साºया परिसराला ‘प्रेवश निषिद्ध’ लिहिलेल्या सूचनांचे जणू तोरणच बांधलेले. साधा कोणी फोटो काढण्याचा प्रयत्न केला तरी अडविले जाते.पण याच कक्षाच्या आत मात्र माणुसकीचा दरवळ. या कक्षात ज्यांची ड्युटी लागली ते डॉक्टर म्हणजे रुग्णाच्या आणि मृत्यूच्या मधली नाजूक रेषा. पीपीई किटमधले साहित्य अंगावर चढवलेले हे डॉक्टर आणि नर्सेस यांची सध्या अविरत धावपळ सुरू आहे. किट घातलेल्या या डॉक्टरांचा चेहराही ओळखणे कठीण. पण एकदा कोरोना कक्षात एन्ट्री केली की ते आपले घरही विसरतात. आपल्यामुळे आपल्या घरांच्यांना धोका होऊ नये म्हणून दोन-दोन दिवस घरीही जात नाही. घरी गेले तरी पोरांशीही दूरनच बोलून समाधान मानतात. पण एवढी मेहनत करूनही त्यांना प्रसिद्धीचा सोस नाही. प्रसिद्धी माध्यमाचा प्रतिनिधी दिसल्यावरही ते ‘आमचे नाव छापा’ म्हणण्याऐवजी ‘तुम्ही इकडे नाही आलात तरच बरे होईल’ म्हणून इतरांचे आरोग्य जपतात.कोरोना कक्षाबाहेर येऊन नातेवाईकांनाही जेव्हा धीर देतात डॉक्टरकोरोनाबाधीत रुग्णांना रुग्णालयाकडून जेवणाची सोय आहे. त्या व्यतिरिक्त रुग्णांचे नातेवाईकही जेवण घेऊन येत आहेत. पण त्यांना बाहेरच थांबविले जाते. शुक्रवारी दुपारी भोसा रोड परिसरातील नातेवाईकांनी एका चारचाकी वाहनांतून तब्बल २० जणांचे जेवण आणले. ते त्यांना कोरोना कक्षापासून दूर अंतरावर ठेवावे लागले. नंतर तीन सुरक्षारक्षकांनी स्ट्रेचर आणून त्यावर ते जेवण ठेवून आत नेले. पण नातेवाईक तिथेच घुटमळत होते.. ‘हमको डॉक्टर साहब से बात करनी हैं’ हा त्यांचा धोशा सुरू होता. अखेर एक डॉक्टर बाहेर आले. रुग्णांचे नातेवाईक म्हणाले, अब हमको ट्रान्सपोर्टेशन की दिक्कत आ रही हैं. पुलीसवाले आने नही देरे.. हमारा एरिया सील किया हुआ हैं. हम मरिजो के लिए खाना कैसे लायेंगे? आप कुछ तो भी पुलीसवालो को बोलीए.’ त्यावर डॉक्टरांनी त्यांना अधिष्ठतांशी बोलायला लावले. तेवढ्यात आणखी एक महिला डॉक्टर बाहेर आल्या. त्यांनाही रुग्णांच्या नातेवाईकांनी आपली व्यथा सांगितली. त्यावर महिला डॉक्टर म्हणाल्या, ‘अभी गर्व्हमेंट के तरफ से जो खाना दिया जा रहा हैं वो भी अच्छा हैं. अगर आपने खाना नही भी लाया तोभी पेशंट को अच्छा खाना हम देंगे. आप फिकर मत करो. पेशंट को अच्छा पानी मिले इस के लिए तीन नए आरो मशिन लगवाये हैं. हम खुद उन के खाने पिने का ध्यान रख रहे हैं.’
कोरोनाग्रस्तांना हळव्या माणुसकीची ‘ट्रीटमेंट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2020 5:00 AM
संचारबंदीने २४ तास घरात असलेले नागरिक दिवसरात्र टीव्हीवर कोरोना संकटाच्या बातम्या पाहण्यात व्यग्र आहेत. यवतमाळात चक्क आठ कोरोनाबाधीत रुग्ण सापडले. त्यांना जेथे ठेवले तिकडे सध्या कोणीही फिरकत नाही. तिकडे फिरकणे धोक्याचेही आहे. पण ज्या कोरोना रुग्णांची सावलीही सध्या इतरांना धोकादायक वाटतेय, इतरांनाच कशाला रुग्णांच्या नातेवाईकांनाही भीती वाटते, त्याच कोरोना रुग्णांच्या अवतीभवती सध्या एकच व्यक्ती दिवसरात्र खंबिरपणे वावरतेय... ती म्हणजे डॉक्टर!
ठळक मुद्दे‘मेडिकल’चे डॉक्टर बनले देवदूत : तब्येतीवर उपचार, घरगुती जेवणापासून शुद्ध पाण्यापर्यंत घेतात काळजी