शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
2
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
3
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
4
'गद्दारांना तुरुंगात टाकू'; सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
5
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य
6
कर्नाटकच्या विरोधी पक्षनेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून HIV बाधित करण्याचा होता प्लॅन? पोलीस निरीक्षकाला अटक
7
महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांनी खरंच बुलडोझरवर चढून प्रचार केला का? जाणून घ्या सत्य
8
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
9
Maharashtra Election 2024 Live Updates: अमित शाहांचा उद्धव ठाकरेंना सवाल; "खरी शिवसेना कधीही..."
10
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
11
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई
12
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
13
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींचं रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”: चेन्नीथला
14
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
15
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
16
Raamdeo Agrawal on Share Market : शेअर बाजारातील घसरणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल
17
Video: तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
18
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल
19
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद

संततधार पावसाने शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2018 11:36 PM

रविवारी सायंकाळपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने नागरिकांची चांगलीच दाणादाण उडाली. मंगळवारी दिवसभर अधून-मधून पाऊस कोसळत होता.

ठळक मुद्देकळमना येथे घर कोसळले : उपविभागातील १६३ घरांना अंशत: नुकसान, महसूल विभागाचे सर्वेक्षण सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : रविवारी सायंकाळपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने नागरिकांची चांगलीच दाणादाण उडाली. मंगळवारी दिवसभर अधून-मधून पाऊस कोसळत होता. नदी-नाल्यांचा पूर ओसरला असला तरी सोमवारी झालेल्या मुसळधार पावसाने वणी मारेगाव तालुक्यातील अंदाजे एक हजार शंभर हेक्टर शेतजमिन पाण्याखाली आली आहे. पाऊस असाच सुरू राहिला तर शेकडो हेक्टरवरील पिकांची नासाडी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.वणी तालुक्यातील घोन्सा येथे मंगळवारी सकाळी सुमारे तीन तास मुसळधार पाऊस कोसळला. त्यामुळे विदर्भा नदी पुन्हा कोपली. पावसापूर्वी या नदीचा पूर ओसरला होता. मात्र पावसानंतर घोन्साकडे जाणाऱ्या पुलावरून पाणी वाहत होते. पुरामुळे पुलाची एक बाजूदेखील खचली. तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे वणी तालुक्यातील कळमना बु. येथील मनोहर कृष्णा सलाम यांचे घर कोसळले. सुदैैवाने यात कोणतीही जिवीत हानी झाली नाही. पावसामुळे वणी तालुक्यातील २४ गावांतील १३८ घरांना अंशत: क्षती पोहचली, तर मारेगाव तालुक्यातील तीन गावांतील २५ घरांची अंशत: पडझड झाली. कळमना बु.येथील मनोहर सलाम यांना शासनातर्फे पाच हजार रुपयांचे अर्थसहाय्य तातडीने देण्यात आले. गेल्या २४ तासांत वणी तालुक्यात ८२.२५ मि.मी.पावसाची नोंद करण्यात आली, तर मारेगाव तालुक्यात ५६.८ मि.मी.पाऊस कोसळला.भर पावसातही महावितरणची यंत्रणा कामालासोमवारपासून वणीत सुरू असलेल्या सतंतधार पावसामुळे वणी परिसरातील महावितरणची यंत्रणा प्रभावीत झाली होती. त्यामुळे परिसरातील २२ गावांचा वीज पुरवठा खंडित झाला होता. पण, आपल्या जीवाची परवा न करता, भर पावसातच महावितरण कर्मचाºयांनी बॅकफिडींगची सोय केल्याने वरील २२ गावांना अखंडित वीज पुरवठा करण्यात आला आहे. पण , पुराच्या वाढलेल्या पातळीमुळे कुंभारकिन्ही जवळ असलेल्या पुलावरून पाणी वाहत असल्याने कुंभारकिन्ही, परसोडा, पिल्की वाढोणा या गावांचा वीज पुरवठा सुरळीत करण्यात व्यत्यय येत आहे. त्यामुळे मंगळवारी सकाळपासून या गावाचा वीज पुरवठा खंडित आहे. निगुर्डा नदीला आलेल्या पुरामुळे या नदीला संमांतर जाणाºया शिंदोला ते पुनवट उपकेंद्राला जोडणाºया ३३ केव्ही वीज वाहिनीचे ४ खांब पडले. परिणामी पुनवट उपकेंद्र प्रभावित झाल्याने या उपकेंद्रावरून ज्या ग्राहकांना वीज पुरवठा करण्यात येतो अशा सर्व गावांचा वीज पुरवठा खंडित झाला होता. तसेच शिरपूर वितरण केंद्राअंतर्गत उच्च दाबाचे ११ व लघू दाबाचे पाच पोल पडले आहेत. वणी ग्रामीणअंतर्गत ३३ केव्ही मोरणी वाहिनीचे ४ पोल झुकले आहेत. राजुरा वाहिनीचे सहा पोल वाकले आहेत, ११ केव्ही वाहिनीचे चार पोल तुटले आहेत. याशिवाय लघुदाबाचे १८ पोल तुटले आहेत. पांढरकवडा उपविभातील बोरी वितरण केंद्राअंतर्गत असलेले ११ केव्हीचे १० पोल पडलेले आहेत. झरी उपविभागातील १८ पोल तर मारेगाव परिसरातील पाच पोल पडले आहे. परिणामी परिसरातील २२ गावांचा वीज पुरवठा खंडित झाला. पण, भर पावसात महावितरणच्या कर्मचाºयांनी लालगुडा उपकेंद्राच्या मदतीने वीज पुरवठा केला.रस्ता गेला वाहूनसंततधार पावसामुळे झरी तालुक्यातील जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले आहे. मुकुटबन-पाटण मार्गावर मुकुटबनपासून अर्धा किलोमिटर अंतरावर असलेल्या पुलावरील रस्ता वाहून गेला. रस्त्याच्या एका कडेला मोठे भगदाड पडले आहे.पावसाचा जोर कायमवणी उपविभागातील काही भागात अद्यापही पावसाचा जोर कायम असून त्यामुळे शेतीची कामे सध्या ठप्प पडली आहे. पावसामुळे शेतीकडे जाणारे रस्ते चिखलमय झाले असून त्यामुळे शेतकºयांना शेतात पोहचणे कठिण झाले आहे. 

टॅग्स :Rainपाऊस