लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यातील अनेक भागात एमआरईजीएसची कामे बंद असल्याने मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. हाताला काम नसल्याने अनेक मजुरांनी स्थानांतर केले आहे. हा प्रश्न शिवसेनेने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनातून मांडला आहे. कामे तातडीने सुरू न झाल्यास आंदोलनाचा इशारा खासदार भावना गवळी यांनी दिला आहे.जिल्ह्यात दुष्काळाची स्थिती आहे. ग्रामीण भागातील मजुरांच्या हाताला काम नाही. एमआरईजीएसच्या कामांचा चांगला आधार त्यांना मिळू शकतो. मात्र अनेक भागातून ही कामे बंद झाली आहेत. बोटावर मोजण्याइतकी कामे सुरू आहे. ही कामे मोठ्या प्रमाणात सुरू केल्यास जिल्ह्यातील मजुरांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न सोडविला जाऊ शकतो. बाभूळगाव, कळंब, राळेगाव आदी तालुक्यातील मजूर परजिल्ह्यात जाण्याच्या तयारीत आहे. या परिस्थितीत त्यांच्या कुटुंबाची वाताहत होण्याची भीती आहे. या संदर्भात दाखल झालेल्या तक्रारीवरून खासदार भावना गवळी व शिवसेनेच्या पदाधिकाºयांनी जिल्हा कचेरीवर धडक दिली. निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले यांना निवेदन देण्यात आले.एमआरईजीएसच्या कामात प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याची बाब खासदार गवळी यांनी यावेळी आरडीसींच्या निदर्शनास आणून दिली. दहा दिवसात कामे सुरू न झाल्यास रस्त्यावर उतरून आंदोलनाचा इशारा दिला. यावेळी जिल्हा प्रमुख राजेंद्र गायकवाड, यवतमाळ विधानसभा संपर्क प्रमुख संतोष ढवळे, निवासी उपजिल्हा प्रमुख प्रवीण पांडे, उपजिल्हा प्रमुख गजानन डोमाळे, किशोर इंगळे, अमोल धोपेकर, विनोद काकडे, दिगांबर मस्के, संजय रंगे, पिंटू बांगर, पंचायत समिती सभापती एकनाथ तुमकर, उपसभापती गजानन पाटील, पंचायत समिती सदस्य नंदाताई कडके, वसंत जाधव, राकेश राऊळकर, विजय पाटील, प्रदीप चिव्हाणे, अमित राडे, इंदल राठोड, गणेश वरडे, राजू धोटे, चंदन नित, रमेश धोटे, शशिकांत खोडके, दिनेश हसतबांधे, नीलेश मेत्रे, नाना धानफुले, संजय डफळे, दयानंद बिरके, राहुल खाडे, गणेश आगरे, प्रवीण लांजेवार आदी उपस्थित होते.
मजुरांवर उपासमारीची पाळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2018 11:35 PM
जिल्ह्यातील अनेक भागात एमआरईजीएसची कामे बंद असल्याने मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. हाताला काम नसल्याने अनेक मजुरांनी स्थानांतर केले आहे. हा प्रश्न शिवसेनेने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनातून मांडला आहे.
ठळक मुद्देदुष्काळी स्थिती : एमआरईजीएसच्या कामांसाठी निवेदन