महागाव : सात जन्मी हाच पती लाभो, म्हणून वटपौर्णिमेला वटवृक्षाची पूजा करून महिला पतीच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करतात. मात्र, तालुक्यातील गुंज येथे पती, पत्नींनी अंधश्रद्धेला मूठमाती देत, वटपौर्णिमेला वटवृक्षांचे रोपण करून अनोख्या पद्धतीने वटपौर्णिमा साजरी केली.
ग्लोबल वॉर्मिंगचा धोका लक्षात घेता, वृक्ष लागवड काळाची गरज बनली आहे. समाजाने सण, उत्सव, वाढदिवसाचे औचित्य साधून वृक्ष लागवडीचा उपक्रम हाती घ्यावा, असे आवाहन गुंज येथील नवदाम्पत्याने केले आहे. वटपौर्णिमेच्या निमित्ताने त्यांनी केलेले वृक्षारोपण कौतुकास्पद असून, अनेकांना प्रेरणा देणारे ठरले आहे.
यावेळी अनिता प्रमोद जाधव, अर्चना शरद जाधव, अनिता ओमप्रकाश गुप्ता, पूजा प्रसाद भालेराव, कांचन नीलेश यादव, पूजा पप्पू डोळस, काजल बंटू तोडक, अश्विनी प्रवीण तोडक, पूजा भानुदास काळे, लंका आकाश पायघन आदींनी वृक्षारोपण केले.