शहरं
Join us  
Trending Stories
1
मी ५ वाजता उपोषण स्थगित करणार; नवव्या दिवशी मनोज जरांगे पाटलांची घोषणा
2
“पोलिसांचे कौतुक करावेसे वाटते, एन्काउंटर करुन चांगलेच केले”; शर्मिला ठाकरे स्पष्टच बोलल्या
3
"पहिल्या नजरेत गडबड दिसतेय"; अक्षय शिंदे एन्काउंटरवर उच्च न्यायालयाने पोलिसांकडे केल्या या मागण्या
4
पाचवी कहाणीही अधूरीच! ७५ वर्षांच्या WWE पैलवानाचा घटस्फोट, आतापर्यंत केलीत ५ लग्नं
5
काल शेतकरी कायद्यावर विधान, दुसऱ्याच दिवशी यू-टर्न; कंगना राणौतने कृषी कायद्यावर केलेले वक्तव्य घेतले मागे
6
अमित शाह म्हणजे बाजारबुणगे, पवार आणि ठाकरेंना महाराष्ट्रातून कुणी संपवू शकत नाही, उद्धव ठाकरेंनी ठणकावले
7
ज्या १० महिन्याच्या चिमुकलीसोबत खेळायचा, तिच्यावर घरी नेऊन केला बलात्कार
8
महालक्ष्मीची हत्या करून तुकडे करणारा नेमका आहे कुठे?; पोलिसांना मिळालं लोकेशन, पण...
9
'हा' IPO खुला होताच तासाभरात पूर्ण सबस्क्राइब; ग्रे मार्केटमध्ये ₹२३६ वर पोहोचला भाव; नफ्याचे संकेत
10
"मलाच लढण्यासाठी जागा नाही", प्रीतम मुंडेंच्या उमेदवारीबद्दल पंकजा मुंडे काय म्हणाल्या?
11
जरांगेंना सवाल, पवारांवर टीका; मराठा-ओबीसी आरक्षणावर देवेंद्र फडणवीस रोखठोक बोलले!
12
Navratri 2024: नवरात्रीत कोणत्याही एका दिवशी करा कुंकुमार्चन, म्हणा 'हा' सिद्धमंत्र!
13
Mukta Arts Share: एक डील आणि सुभाष घई यांच्या कंपनीचा शेअर बनला रॉकेट; लागलं अपर सर्किट, जाणून घ्या
14
काळा पैसा, दहशतवाद अन् भ्रष्ट राजकारण ही मोठी समस्या; FATF रिपोर्टमधून भारताला इशारा
15
आमच्या जीवाला धोका, मध्यरात्री ४ तरुण हल्ल्याच्या उद्देशाने आल्याचा लक्ष्मण हाके यांचा दावा
16
Guru Pushyamrut Yoga 2024: पितरांच्या आशिर्वादाबरोबरच, दत्त आणि लक्ष्मी कृपेचा सुवर्णयोग; टाळा 'या' चुका!
17
Mallikarjun Kharge : "शेतकऱ्यांना वाहनाखाली चिरडणाऱ्या मोदी सरकारने अन्नदात्यांसाठी..."; खरगेंचा घणाघात
18
गुरुभक्तीचा सुपंथ, शिष्यांचा उद्धार, गजानन महाराज-शंकर महाराज यांच्यात ‘हा’ समान धागा; वाचा
19
बच्चू कडूंना अक्षय शिंदेचा एन्काउंटर कधी झाला हेच माहिती नाही; पण 'देवाभाऊ न्याय'वर दिली बोचरी प्रतिक्रिया...

ऑनलाईन शिक्षणाचा बोजवारा; ७१ हजार शाळांमध्ये इंटरनेट सुविधाच नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: July 07, 2021 7:14 AM

देशभरातील प्रत्येक शाळेतील सुविधांची आकडेवारी केंद्रीय शिक्षण खात्याने गोळा केली. यू-डायस प्लस या प्रणालीत शाळांनीच भरलेल्या या आकडेवारीचा अहवाल केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांनी ट्विटद्वारे नुकताच जाहीर केला.  

अविनाश साबापुरे -यवतमाळ : कोरोनामुळे शाळा बंद असल्या तरी ऑनलाईन शिक्षण सुरू असल्याचा दावा राज्याचा शालेय शिक्षण विभाग करीत आहे. प्रत्यक्षात महाराष्ट्रातील एक लाख शाळांपैकी ७१ हजार शाळांमध्ये इंटरनेट सुविधाच नसल्याची बाब यू-डायस प्लसच्या ताज्या अहवालातून पुढे आली आहे. त्यामुळे दीड वर्षांपासून शिक्षण विभाग ऑनलाईन शिक्षणाबाबत किती गंभीर आहे, हे दिसून येते. देशभरातील प्रत्येक शाळेतील सुविधांची आकडेवारी केंद्रीय शिक्षण खात्याने गोळा केली. यू-डायस प्लस या प्रणालीत शाळांनीच भरलेल्या या आकडेवारीचा अहवाल केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांनी ट्विटद्वारे नुकताच जाहीर केला.  देशात १५ लाख शाळा आहेत. त्यापैकी फक्त ३ लाख ३५ हजार ८८२ शाळांमध्येच इंटरनेट सुविधा आहे. महाराष्ट्रात १ लाख १० हजार २२९ शाळांपैकी केवळ ३९ हजार १४ शाळांमध्ये इंटरनेट सुविधा उपलब्ध असून ऑनलाईन वर्ग सुरू आहेत. हे प्रमाण केवळ ३५.३९ टक्के आहे. ७१ हजार २१५ शाळांमध्ये इंटरनेटचा पत्ता नाही. गंभीर म्हणजे ३१ हजार  ८९० शाळांमध्ये साधा संगणकही नाही. राज्यात ८९८ शाळा मान्यतेविनाच सुरू असून त्यापैकी ६२४ शाळा ऑनलाईन वर्ग घेतात.

शाळांमधील इंटरनेटची स्थिती -                    शाळा              इंटरनेट        प्रमाणदेश          १५,०७,७०८    ३,३५,८८२      २२.२८महाराष्ट्र     १,१०,२२९        ३९,०१४         ३५.३९

राज्यातील स्थिती -प्रकार     संख्या     इंटरनेट शासकीय     ६५,८८६     ७,१४९अनुदानित     २३,७९१     १५,१२६खासगी     १९,६५४     १६,११५ 

अभ्यासक्रम फक्त होतो ‘फॉरवर्ड’इंटरनेट सुविधा नसलेल्या शाळांचे ऑनलाईन वर्ग भरतच नाही. शिक्षण विभागाकडून आलेला अभ्यासक्रम शिक्षक ज्या पालकांकडे अँड्रॉईड फोन आहे, त्यांना व्हॉट्स ॲपवरून फक्त फॉरवर्ड करतात.

 

 

टॅग्स :SchoolशाळाonlineऑनलाइनStudentविद्यार्थी