शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

७५ वर्षांनी झालो साक्षर अन् आनंदात केले मतदान !

By अविनाश साबापुरे | Published: April 26, 2024 5:38 PM

Yawatmal : ईव्हीएमचे बटण दाबताच वृद्ध शेतमजूर दाम्पत्याचे खुलले चेहरे

यवतमाळ : रोज शेतात जाणे.. दिवसभर काबाडकष्टात हरपून जाणे अन् रात्री जमिनीवर पडताच वेदना जोजवित झोपी जाणे... हाच त्यांचा दिनक्रम. ना दुनियेची खबर ना राजकीय घडामोडींची उत्सुकता. पण अर्धे-अधिक आयुष्य उलटून गेल्यावर यंदा पहिल्यांदाच त्यांना साक्षरतेचे धडे मिळाले. त्यात मतदानाची प्रक्रिया शिकविण्यात आली. त्यातून निवडणूक साक्षर झालेल्या या वृद्ध शेतमजूर दाम्पत्याने इव्हीएमचे बटण दाबले अन् स्वत:च हरखून गेले.

मतदानाचा हा आगळावेगळा आनंद पहिल्यांदाच अनुभवणाऱ्या दाम्पत्याचे नाव आहे मणिराम रामपुरे आणि सखूबाई रामपुरे. वयाची ७५ वर्षे त्यांनी अडाणी म्हणून व्यतीत केली. यवतमाळ तालुक्यातील कारली हे त्यांचे छोटेसे गाव. रोजमजुरी करून गुजराण करणे या पलिकडे त्यांना फारसे काही ठाऊक नव्हते. देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा होत असताना त्यांच्या निरक्षरतेचाही अमृतमहोत्सव होऊन गेला. पण यंदा त्यांच्यासाठीही नव भारत साक्षरता मोहीम राबविण्यात आली. त्यात गावातील शिक्षकांनी त्यांची नोंदणी केली. काही महिने त्यांना साक्षरतेचे धडे देण्यात आले. त्यात पाठ्यपुस्तकातून मतदान प्रक्रियाही शिकविण्यात आली. अन् लगेच लोकसभेची निवडणूक आली. शुक्रवारी २६ एप्रिल रोजी यवतमाळ-वाशिम मतदारसंघाकरिता त्यांनी मतदान केले. गावातीलच शाळेच्या केंद्रात दोघेही पती-पत्नी पाहोचले अन् कुणाच्याही मदतीशिवाय यादीत स्वत:चे नाव शोधून त्यांनी ईव्हीएमवरील बटण ‘सोच समझकर’ दाबले. बटण दाबताच आपल्या ‘भारतीय नागरिकत्वा’चा जणू साक्षात्कार झाल्यागत ते आनंदून गेले. शाळेबाहेर आल्यावर शिक्षकांना भेटून त्यांनी मतदान केल्याची खूण दाखवित फोटो काढून घेतला. त्यावेळी मतदानाच्या आपल्या अधिकाराबाबत हे वृद्ध दाम्पत्य जे बोलले, ते ऐकून केंद्र प्रमुख स्वप्नील फुलमाळी हेदेखिल स्तब्ध झाले.

आम्ही आमचे कर्तव्य पार पाडले साहेब. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला मतदानाचा अधिकार दिला. त्या अधिकाराचा योग्य वापर करून प्रत्येकाने योग्य उमेदवार निवडून द्यावा. - मणिराम रामपुरे, सखूबाई रामपुरे, प्रौढ असाक्षर, कारली (यवतमाळ)

आठ मतदारसंघात एक लाखावर प्राैढांचे मतदानयवतमाळच्या मणिराम आणि सखूबाई रामपुरे या निरक्षर दाम्पत्याप्रमाणेच शुक्रवारी लोकसभेच्या आठही मतदारसंघात हजारो प्रौढ निरक्षरांनी पहिल्यांदाच ‘निवडणूक साक्षर’ होऊन मतदान केले. अमरावती मतदारसंघात २४ हजार ६५२, अकोलामध्ये १८ हजार ८८१, बुलढाणामध्ये ५ हजार २३३, यवतमाळ-वाशिममध्ये २६ हजार ९४८, वर्धामध्ये १ हजार ३६७, हिंगोलीत ८ हजार ७९४, नांदेडमध्ये १८ हजार ३९३, तर परभणी मतदारसंघात १४ हजार २२७ अशा एकंदर १ लाख १८ हजार ४९५ प्रौढ निरक्षरांना ‘निवडणूक साक्षर’ करण्यात आले आहे. त्यांच्यातील बहुतांश प्रौढांनी मतदान केले.

 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४ElectionनिवडणूकVotingमतदान