शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
राहुल गांधींनी कोर्टात हजर राहावे; वीर सावरकर बदनामी प्रकरणी पुणे कोर्टाचे आदेश
3
ISRO आणि SpaceX ची भागीदारी यशस्वी, इलॉन मस्क यांनी लॉन्च केलं भारताचं सॅटेलाइट
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
5
पुतिन, झेलेन्स्कींनी मला भेटून तोडगा काढावा; तिसरे महायुद्ध टाळायलाच हवे -डोनाल्ड ट्रम्प
6
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
7
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
8
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
9
धर्म धोक्यात नाही तर आरक्षण धोक्यात आहे, श्रीकृष्ण आयोग लागू करा -प्रकाश आंबेडकर
10
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
11
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा
12
मणिपूरच्या असह्य वेदना; बिरेन सिंह सरकारबद्दल निर्णय घेण्याची गरज!
13
तिकडे डोनाल्ड ट्रम्प.. आणि इकडे नरेंद्र मोदी
14
निवडणूक निकालानंतर बेकायदा होर्डिंग्ज लावल्यास कारवाई करा; हायकोर्टाचे राज्य सरकार, पोलीस प्रमुखांना निर्देश
15
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
16
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
17
विशेष लेख: अझरबैजानमधल्या हवामानबदल परिषदेवर चिंतेचे मळभ!
18
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
19
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
20
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार

यवतमाळच्या डॉक्टरांनी सुचवलं कोरोनाला टक्कर देणारं औषध, ICMR ने घेतली दखल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2020 11:40 AM

यवतमाळचे डॉक्टर प्रशांत चक्करवार यांना ‘मोन्टेलुकास्ट सोडियम’ या औषधाची क्लिनिकल ट्रायलसाठी परवानगीकरिता आयसीएमआरने (इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च) ऑनलाईन प्रेझेन्टेशन सादर करण्यास सांगितले आहे.

ठळक मुद्देकोविड उपचारासाठी औषध ‘डीजीसीआय’कडे केली क्लिनिकल ट्रायलची शिफारस

सुरेंद्र राऊत ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोना विषाणू संसर्गामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी दमा व अस्थमा रुग्णांच्या उपचारात वापरली जाणारे ‘मोन्टेलुकास्ट सोडियम’ हे औषध प्रभावित ठरू शकते, असे गृहितक आहे. भारतात या औषधाची क्लिनिकल ट्रायलसाठी परवानगी द्यावी याकरिता यवतमाळचे डॉक्टर प्रशांत चक्करवार यांनी पाठपुरावा केला. याची दखल घेत आयसीएमआरने (इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च) त्यांना ऑनलाईन प्रेझेन्टेशन सादर करण्यास सांगितले.त्यानुसार २२ जूनला डॉ. चक्करवार यांनी प्रेझेन्टेशन दिले. याची दखल घेऊन एक्सपर्ट कमिटीने या ड्रगची क्लिनिकल ट्रायल घेण्याची परवानगी द्यावी शिफारस ‘डीजीसीआय’कडे (ड्रग्ज कंट्रोलर जनरल आॅफ इंडिया)केली आहे.कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू हा फुफ्फुसावर सूज आल्याने व रक्तगाठीमुळे (सायटोकाईन्स) होतो. कोरोनाच्या चार ते पाच टक्के रुग्णांमध्ये खूप जास्त प्रमाणात सायटोकाईन्स तयार होतात. सायटोकाईन्सच्या अधिक निर्मितीमुळे शरीरात मोठ्या प्रमाणात सुज येऊन नंतर रक्ताच्या गाठी तयार होतात. परिणामी शरिरातील ऑक्सीजनचे प्रमाण ८८ टक्के पेक्षा कमी होते. कृत्रिम श्वासोश्वास द्यावा लागतो.भारतात मोन्टेलुकास्टची क्लिनिकल ट्रायल घेण्यात यावी असा प्रस्ताव डॉ. प्रशांत चक्करवार यांनी आयसीएमआर यांच्यापुढे ठेवला. त्यानंतर आयसीएमआरच्या निर्देशावरुन एक्सपर्ट कमिटीसमोर डॉ. चक्करवार यांनी ऑनलाईन प्रेझेन्टेशन सादर केले. भोपाळ एम्समधील फार्माकोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ.वाय.जे. गुप्ता यांनी हे प्रेझेन्टेशन ऐकले. त्यानंतर एक्सपर्ट कमिटीने डॉ. चक्करवार यांनी सूचविलेल्या मोन्टेलुकास्ट या जेनरिक औषधाचा कोविडच्या रुग्णांवर वापर केला जावा, अशी शिफारस ‘डीजीसीआय’कडे केली. मोन्टेलुकास्ट सोडियममुळे सायकोटाईन्स नियंत्रणात येतात हे नवे गृहितक डॉ. चक्करवार यांनी मांडले आहे. यापूर्वीच्या रिसर्चमध्ये केवळ मोन्टेलुकास्टमुळे सुज कमी होते. हाच समज होता. क्लिनिकल ट्रायलमध्ये मोन्टेलुकास्ट हे औषध प्रभावी ठरल्यास कोरोनामुळे होणारे मृत्यू बऱ्याचअंशी थांबविता येणार आहे. शिवाय ही जेनरिक औषधी असल्याने अतिशय स्वस्तात उपलब्ध करून देणे सहज शक्य असल्याचे डॉ. चक्करवार यांनी ‘लोकमत’ला सांगितले.मोन्टोलुकास्ट असे करते कामसुज कमी करणे व गाठी तयार होऊ नये यासाठी मोन्टेलुकास्ट हे औषध रामबाण ठरू शकते. अतिरिक्त तयार होणाऱ्या सायकोईन्सवर नियंत्रण आणता येते. शिवाय फुफ्फुसावर सूज आणणाऱ्या केमिकल्सला रोखू शकते. यावर कॅनडा येथे मॅकगील युनिर्व्हसिटी व लेडी डेव्हिस इन्स्टिट्युट या दोन विद्यापीठाने क्लिनीकल ट्रायलला परवानगी दिली आहे. त्याचे सकारात्मक परिणाम तेथे येत आहेत.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्या