लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : समता पर्व प्रतिष्ठानच्यावतीने येथील समता मैदानात आयोजित चार दिवसीय समता पर्वात विविध कार्यक्रम पार पडले. वैचारिक प्रबोधन, परिसंवाद, यवतमाळ आयडॉल या कार्यक्रमांचा प्रामुख्याने समावेश होता.उद्घाटनप्रसंगी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी शुभेच्छा संदेश देत भातकुलीचे उपविभागीय अधिकारी नरेंद्र फुलझेले यांच्या हस्ते उद्घाटन झाले. प्रसंगी अनिल बहादुरे, डॉ. मिलिंद कांबळे, माध्यमिक शिक्षणाधिकारी दीपक चवने, गजानन उले, संतोष मनवर, डॉ. दिलीप महाले, इंजिनिअर दीपक नगराळे, सिद्धार्थ भवरे, प्रमोदिनी रामटेके, पुष्पा राऊत, अॅड. रामदास राऊत, शैलेश गाडेकर, अॅड. जयसिंह चव्हाण, संदीप कोटंबे, निरज वाघमारे, जे.डी. मनवर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.संध्याकाळी बाल कलाकार यश विलास गायकवाड याचे चित्र प्रदर्शन व काव्य प्रदर्शनाचे उद्घाटन जिओ सायंटिस्ट डॉ. सविंदर राम यांच्या हस्ते झाले. यावेळी विद्युत कंपनीचे अधीक्षक अभियंता सुरेश मडावी, जिल्हा परिषद पतसंस्थेचे अध्यक्ष राजुदास जाधव, अशोक वानखडे, अनिल आडे, डॉ. दिलीप घावडे, मनोहर शहारे, प्राचार्य भीमराव ढेंगळे, चंद्रप्रकाश वाहने, भारशंकर, अॅड. मिलिंद भगत, घनश्याम नगराळे, नरेंद्र गद्रे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी डॉ. सविंदर राम यांना महात्मा जोतिबा फुले-डॉ. बाबासाहेब आंबेडकर समतारत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. चंद्रकांत सरदार, संचालन सुनील वासनिक यांनी केले.समता विचारवेध सत्राची सुरुवात वेशभूषा यासह विविध स्पर्धांनी झाली. यवतमाळ आयडॉलची दुसरी फेरी घेण्यात आली. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे पत्रकार उर्मिलेश सिंह यांनी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर समकालीन समाज और लोकतंत्र का भविष्य’ या विषयावर मार्गदर्शन केले. लोकमतचे यवतमाळ येथील उपसंपादक अविनाश साबापुरे, कपिल श्यामकुंवर, संजय राठोड, केशव सवळकर यांना पत्रकारिता पुरस्कार देण्यात आला. पत्रकार उर्मिलेश सिंह यांना समता पर्वतर्फे दिला जाणारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर पत्रकारिता पुरस्कार प्रदान करण्यात आला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्ञानेश्वर गोबरे होते. चंद्रशेखर खंदारे, विशाल जाधव, सुनील अवचार, राजुदास जाधव, अभियंता भारशंकर, राहुल भरणे, अनिल बहादुरे, बाळकृष्ण सरकटे, प्रा. शैलेश तेलंग यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी हेमंत कांबळे यांना नारायण सुर्वे काव्य पुरस्कार प्रदान करण्यात आला. संचालन मन्सूर एजाज जोश, प्रास्ताविक विनोद फुलमाळी, तर आभार शंतनू देशभ्रतार यांनी मानले.तिसरे समता विचारवेध सत्र प्रामुख्याने महिलांसाठी होते. यात ‘फुले-आंबेडकरी तत्त्वज्ञान आणि भारताची लोकशाही’ या विषयावर डॉ. रेखा मेश्राम यांनी मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी राज्य कर अधिकारी प्रज्ञा नरेंद्र फुलझेले होत्या. विशेष अतिथी म्हणून रंजना नगराळे, डॉ. लीला भेले, चिंतामण वंजारी, कुंदा तोडकर, विद्या खडसे यांची उपस्थिती होती. त्यांनी आपले विचार मांडले. शिक्षण संघर्ष समिती अमरावतीच्या अध्यक्ष संगीता शिंदे यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. संचालन अर्चना खोब्रागडे यांनी, तर आभार राहुल पाटील यांनी मानले.समारोपीय कार्यक्रम विधान परिषदेचे माजी उपाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या अध्यक्षतेत झाला. याप्रसंगी लोकप्रतिनिधींनी पाठविलेल्या शुभेच्छा संदेशांचे वाचन करण्यात आले. सुरज खोब्रागडे यांनी प्रास्ताविक केले. समता पर्वाची भूमिका विनोद फुलमाळी यांनी मांडली. संचालन जगदीश भगत यांनी, तर आभार राहुल पाटील यांनी मानले. यवतमाळ आयडॉलचे प्रथम पारितोषिक स्नेहल चव्हाण यांना देण्यात आले. अक्षय गुजर, किरण वाघमारे यांना अनुक्रमे द्वितीय, तृतीय पारितोषिक प्रदान करण्यात आले. स्वरांजली कुडमेथे ही प्रोत्साहनपर पारितोषिकाची मानकरी ठरली. अंकुश वाकडे यांच्या आभार प्रदर्शनाने समारोप झाला.
वैचारिक प्रबोधन, परिसंवाद अन् यवतमाळ आयडॉल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2019 10:26 PM
समता पर्व प्रतिष्ठानच्यावतीने येथील समता मैदानात आयोजित चार दिवसीय समता पर्वात विविध कार्यक्रम पार पडले. वैचारिक प्रबोधन, परिसंवाद, यवतमाळ आयडॉल या कार्यक्रमांचा प्रामुख्याने समावेश होता. उद्घाटनप्रसंगी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी शुभेच्छा संदेश देत भातकुलीचे उपविभागीय अधिकारी नरेंद्र फुलझेले यांच्या हस्ते उद्घाटन झाले.
ठळक मुद्देसमता पर्व : पत्रकारांसह विचारवंतांचा गौरव, महिलांसाठी विशेष चर्चासत्र, समारोपात बक्षीस वितरण