शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

वणीत विनापरवानगी शेकडो ब्रास मुरुमाचे अवैध उत्खनन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2024 4:28 PM

जेसीबी जप्त : नैसर्गिक टेकडीच खोदली, अद्याप दंडाची कारवाई नाही

लोकमत न्यूज नेटवर्क वणी: लगतच्या वागदरा शिवारात शुक्रवारी अवैधरीत्या मुरुमाचे उत्खनन होत असल्याची माहिती महसूल प्रशासनाला मिळताच स्थानिक मंडळ अधिकारी व तलाठ्याने पंचनामा करून जेसीबी जप्त केला आहे.

वागदरा गावालगत पंकज बन्सीलाल भंडारी यांची शेतजमीन आहे. येथेच नैसर्गिक टेकडीवर जेसीबीच्या साहाय्याने खोदकाम सुरू असल्याची माहिती महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. खोदकाम केलेल्या नैसर्गिक टेकडीचा पंचनामा करून लगतच शेतमालकाला विचारपूस केली. यात सहा मीटर रुंद व दोन मीटर खोल असे खोदकाम केले असल्याचे निष्पन्न झाले. शिवाय ७८० चौरस मीटर मुरुमाचे खोदकाम करून सदर मुरुमाची वाहतूक केल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. वागदरा गावात माती, मुरूम चोरीचेही प्रस्थ वाढत सर्वत्र पहावयास मिळत आहे. शेतीचे उत्खनन करण्याच्या नावावर माती-मुरूमची बेकायदेशीररित्या तस्करी बिनधास्त सुरू आहे. राजरोसपणे जेसीबी, पोकलेन मशीनच्या साहाय्याने नियमापेक्षाही जास्त जमीन खोदून मुरूम लंपास केला जातो. हा सगळा प्रकार इतका सराईतपणे होत आहे की, कुणालाच कायद्याची किंवा कारवाईची भीती वाटत नाही. याच्या पाठीमागे काय गौडबंगाल आहे, याचं गणित सामान्य माणसाला उलगडत नाही. कमी ब्रासची रॉयल्टी काढून जास्त ब्रास मुरूम काढणे किंवा शेकडो ब्रास रॉयल्टीच्या नावाखाली हजारो ब्रास मुरूम काढण्याच्या अनुचित प्रकाराने शासनाला लाखो रुपयांचा चुना लावला जात आहे. महसूल प्रशासनाने रॉयल्टीधारकांनी दिलेल्या नियोजित जागेवर जाऊन परवानगी आणि प्रत्यक्ष केलेले उत्खनन याची चौकशी करून कारवाई केल्यास रॉयल्टीच्या नावावर मोठे घबाड उघडे पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

संभाजी ब्रिगेडचा आंदोलनाचा पवित्रा वणी विभागात होत असलेले अवैध उत्खनन, वाहतूक व तस्करी तत्काळ थांबवली नाहीतर संभाजी ब्रिगेडतर्फे आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. वागदरा (नविन), मोहदा, रासा, वांजरी आदी गावात मागील काही वर्षापासून मुरुमाचे सर्रास उत्खनन सुरू आहे. याबाबत संबंधित विभाकडे अनेकदा संभाजी ब्रिगेड व त्या परिसरातील नागरिकांनी तक्रारी केल्या. परंतु संबंधित अधिकारी व कर्मचारी अवैध उत्खनन व वाहतूक करण्यास जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत. निवेदन देताना संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अजय धोबे, अॅड. अमोल टोंगे, खलील शेख, दत्ता दोहे, आशिष रिंगोले व इतर नागरिक उपस्थित होते.

"याबाबत मंडळ अधिकारी व तलाठ्यांनी अहवाल सादर केला. त्याप्रमाणे एकाच गटात खोदकाम करून त्याची इतरत्र कुठेही वाहतूक झाली नाही. यात कुठेही गैरप्रकार आढळला नाही."- निखिल धुळधर, तहसीलदार वणी

टॅग्स :YavatmalयवतमाळMining Scamखाण घोटाळा