लोकमत न्यूज नेटवर्कनेर : शहरात एलसीबीच्या पथकाने शनिवारी रात्री दोन ठिकाणी धाड टाकून १५ हजार २०० लिटर रॉकेल जप्त केले. हा साठा अर्धघाऊक परवानाधारकाचा असल्याचे निष्पन्न झाले. संबंधिताने रॉकेल साठ्याबाबत कोणतेही अधिकृत कागदपत्र न दिल्यामुळे पोलिसांनी साठा जप्त केला.स्वस्त दरात वितरित केले जाणारे शासकीय रॉकेल साठा करून वाहनांना इंधन म्हणून विक्री होत असल्याच्या संशयावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकली. घाऊक परवानाधारक मजहरखान पठाण रा. गांधी चौक याच्याकडे चौकशी केली. लेखी सूचनापत्र देऊन माहिती मागितली असता त्याने साठ्याची नोंद असलेले कागदपत्र गहाळ झाल्याचे उत्तर दिले. पोलिसांनी दुकान गाळ््याची झडती घेतली. त्यात ४ हजार ४०० लिटर, तर अमरावती रोडवरच्या गोदामात १० हजार ८०० लिटर असे १५ हजार २०० लिटर रॉकेल सापडले. याची किंंमत चार लाख ३२ हजार रुपये आहे. परवानाधारकाचा मुलगा अजहरखान पठाण याला तब्यात घेतले. सदर परवानाधारकाकडे महिन्याकाठी १९ हजार लिटर रॉकेल नियतन करण्याचा परवाना आहे. तेव्हा इतका साठा कसा, हा प्रश्न उपस्थित झाला. पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीवरून नेर ठाण्यात गुन्हा नोंद केला.ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. राज कुमार, अपर अधीक्षक अमरसिंह जाधव, एलसीबीचे पोलीस निरीक्षक मुकुंद कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात सहायक निरीक्षक सूरज बोंडे, फौजदार उमेश नासरे, भीमराव शिरसाठ, ओमप्रकाश यादव, गजानन डोंगरे, विशाल भगत, महेश पांडे, किशोर झेंडेकर, सुधीर पिदूरकर, शुभम सोनुर्ले यांनी केली. पुढील तपास नेर ठाणेदार अनिल किनगे करीत आहेत.काळ्याबाजाराला पुरवठा विभागाचे अभयनेर शहरात रेशनच्या रॉकेलचा राजरोसपणे काळाबाजार सुरू आहे. याची पुरेपूर माहिती असूनही स्थानिक तालुका पुरवठा विभागाने कोणतीच कारवाई केली नाही. यवतमाळातील पोलीस पथकाने हा काळाबाजार कारवाईतून उघड केला. यावरून तालुका पुरवठा विभागाचे लागेबांधे या काळ्या व्यवसायाशी असल्याचा संशय व्यक्त होत आहे. आता पुढील कारवाई पुरवठा विभागाचे अधिकारी किती प्रामाणिकपणे बजावतात की सोयीची भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नेर येथे अवैध रॉकेलसाठ्यावर धाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2018 10:22 PM
शहरात एलसीबीच्या पथकाने शनिवारी रात्री दोन ठिकाणी धाड टाकून १५ हजार २०० लिटर रॉकेल जप्त केले. हा साठा अर्धघाऊक परवानाधारकाचा असल्याचे निष्पन्न झाले. संबंधिताने रॉकेल साठ्याबाबत कोणतेही अधिकृत कागदपत्र न दिल्यामुळे पोलिसांनी साठा जप्त केला.
ठळक मुद्देएलसीबीची कारवाई : १५ हजार लिटर रॉकेल जप्त, एकास अटक