उपविभागीय अधिकारी जयंत देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार सुभाष जाधव व महसूल विभागाच्या पथकाने ही कारवाई केली. तालुक्यात अवैध रेती व्यवसायाला पायबंद घालण्यासाठी महसूल विभागाच्या वतीने रेती व्यावसायिकांविरुद्ध कारवाईसाठी धडक मोहीम हाती घेण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार अवैध रेती उत्खननावर प्रतिबंध आणण्याच्या दृष्टीने महसूल आणि पोलीस विभागाची मंडळनिहाय संयुक्त दक्षता पथकाची नेमणूक करण्यात आली.
पथकात नायब तहसीलदार संजय जाधव, एस.जे. सरागे, आर.के. तुपसुंदरे यांच्या नेतृत्वाखाली मंडळ अधिकारी राऊत, एस.एस. खानझोडे, डी.डी. डोल्हारकर, तलाठी बी.एम. धोटे, धनराज राऊत, व्ही.एस. गिरी, एन.पी. कोत्तावार, सी.डी. पुसनाके, व्ही.बी. सूर्यवंशी, पीएसआय ढोके, पीएसआय राठोड, हेड कॉन्स्टेबल वानखडे, श्याम मिराशे, मोहसीन खान, सुनील टेके आदींचा समावेश आहे.
या पथकाकडून रेती घाटांवर सरप्राइज व्हीजिट, रात्र गस्त, तसेच शहरातील प्रमुख चौकात फिक्स पॉइंट नाकाबंदी करून अवैध रेती व्यवसायावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. त्याचबरोबर, शहरातील काही भागात मोठ्या प्रमाणात रेतीचे साठे करून ठेवण्यात आले होते.
बॉक्स
२०६ ब्रास रेतीसाठा गवसला
माहिती मिळताच, तहसीलदार सुभाष जाधव यांच्या आदेशानुसार, पथकाने वेगवेगळ्या १२ ठिकाणी धडक देऊन २०६ ब्रास रेती साठा जप्त केला. त्यानंतर, जप्तीतील रेतीची लिलावाद्वारे विक्री करण्यात आली. महसूल विभागाने सुरू केलेल्या या मोहिमेमुळे रेती चोरीला आळा बसला आहे.