लोकमत न्यूज नेटवर्कवणी : माणसाच्या आयुष्यात गुरूचे महत्व असामान्य असते. केवळ गुरूच माणसाला चांगला मार्ग दाखवू शकतो आणि त्यातून माणसाची उन्नती होते, असे प्रतिपादन पूज्य गुरूदेव गणेशलालजी महाराज यांच्या सुशिष्या जैन साध्वी चैतन्याश्री म.सा. यांनी येथील जैन स्थानकात केले.गुरूपौर्णिमेच्या पावन पर्वावर मंगळवारपासून येथील जैन स्थानकात साध्वी चैतन्याश्री म.सा. यांच्या चातुर्मासाला प्रारंभ झाला. त्यावेळी त्या बोलत होत्या. गुरूपौर्णिमेचे औचित्य साधून त्यांनी आयुष्यात गुरूला किती महत्व आहे, याचे विवेचन केले. मनात क्षमा, भाव टिकविण्यासाठी चातुर्मासात जप, तपाला अतिशय महत्व असल्याचे त्यांनी सांगितले. गुरूची महती सांगताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, रामदास महाराज, गुरू गोविंद सिंग, राजा रणजितसिंग यांची उदाहरणे देऊन त्यांच्या आयुष्यातील अनेक घटना साध्वी चैतन्यश्री यांनी याप्रसंगी उपस्थितांना सांगितल्या. यावेळी जैन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रत्येकाच्या जीवनात गुरूचे महत्त्व असामान्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2019 10:19 PM
माणसाच्या आयुष्यात गुरूचे महत्व असामान्य असते. केवळ गुरूच माणसाला चांगला मार्ग दाखवू शकतो आणि त्यातून माणसाची उन्नती होते, असे प्रतिपादन पूज्य गुरूदेव गणेशलालजी महाराज यांच्या सुशिष्या जैन साध्वी चैतन्याश्री म.सा. यांनी येथील जैन स्थानकात केले.
ठळक मुद्देसाध्वी चैतन्याश्री : वणीतील जैन स्थानकात चातुर्मासाला प्रारंभ