लोकमत न्यूज नेटवर्क झरी : येथील नगरपंचाय हद्दीत असलेले अतिक्रमण काढण्याची मोहिम नगरपंचायतीने हाती घेतली आहे. शुक्रवारी पहिल्या दिवशी शहरातील मुख्य मार्गावर असलेले अतिक्रमण हटविण्यात आले. यावेळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. शहरातील अतिक्रमणाचे सर्वेक्षण करून अतिक्रमणधारकांना नगरपंचायतीच्यावतीने रितसर नोटीस बजावण्यात आली होती. त्यानंतर शुक्रवारी सकाळपासून अतिक्रमण हटाव मोहिमेला प्रारंभ करण्यात आला. यावेळी नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी पूनम कळंबे व नगरपंचायतीतील कर्मचारी उपस्थित होते. पाटणचे ठाणेदार दिगंबर इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेण्यात आला होता. मोहिमेदरम्यान, काहींना अतिक्रमण हटविण्यासाठी सात दिवसांची मुदत देण्यात आली. या मोहिमेमुळे रस्त्यावर लहानसे दुकान थाटून गुजरान करणाऱ्या छोट्या व्यावसायिकांच्या जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
झरी नगरपंचायतची अतिक्रमण हटाव मोहीम
By admin | Published: May 27, 2017 12:20 AM