लोकमत न्यूज नेटवर्कनेर : तालुक्याच्या टाकळी (डोल्हारी) येथील प्रकल्पग्रस्तांनी गुरुवारपासून गावातच बेमुदत उपोषणाला प्रारंभ केला आहे.गावकऱ्यांनी गुरुवारी जलसमाधीचा इशारा दिला होता. मात्र जिल्हा प्रशासनाच्या आवाहनावरून जलसमाधी आंदोलन लांबणीवर टाकण्यात आले असून तूर्त बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे. टाकळी (डोल्हारी) प्रकल्पाचे उपअभियंता पवार यांना निलंबित करण्यात यावे, गावकºयांना विश्वासात न घेता पुनर्वसनासाठी निवडलेली जागा रद्द करण्यात यावी आणि प्रकल्पग्रस्तांना त्वरित मोबदला द्यावा, या मागण्यांसाठी हे उपोषण सुरू करण्यात आले आहे. मागण्या मान्य न झाल्यास २१ डिसेंबरला जलसमाधी आंदोलन सुरू करण्याचा इशारा प्रकल्पग्रस्तांनी दिला आहे. या आंदोलनात सतीश भोयर, सतीश देशमुख, अजय भोयर, विजय सांगळे, इस्माईल शहा आदी सहभागी झाले. या प्रकल्पासाठी खास व्यापाºयांना जमिनी घ्यायला लाऊन त्या संपादित केल्या गेल्या. त्यामुळे गावकºयांचे पुनर्वसन नेरपासून लांबणीवर गेले. व्यापाºयांच्या या जमिनीत मोठी भागिदारी व आर्थिक उलाढाल झाल्याचा प्रकल्पग्रस्तांचा आरोप आहे. या प्रकल्पासाठी शेतकºयांच्या जमिनी संपादित केल्या असत्या तर नेरपासून अगदी जवळ पुनर्वसन होऊ शकले असते. त्यामुळेच पुनर्वसनाच्या नियोजित जागेला प्रकल्पग्रस्तांचा विरोध आहे. दरम्यान, विधान परिषदेचे माजी उपसभापती माणिकराव ठाकरे, माजी राज्यमंत्री संजय देशमुख यांनी अधिकाºयांशी संपर्क साधून शासनाकडे पाठपुरावा करण्याची ग्वाही दिली. त्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.
टाकळी प्रकल्पग्रस्तांचे बेमुदत उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2018 9:46 PM
तालुक्याच्या टाकळी (डोल्हारी) येथील प्रकल्पग्रस्तांनी गुरुवारपासून गावातच बेमुदत उपोषणाला प्रारंभ केला आहे. गावकऱ्यांनी गुरुवारी जलसमाधीचा इशारा दिला होता.
ठळक मुद्देउपअभियंत्याच्या निलंबनाची मागणी : २१ डिसेंबरला जलसमाधीचा इशारा