शहरं
Join us  
Trending Stories
1
अरुण गवळीची मुलगी गीता गवळी ठाकरे गटाच्या संपर्कात; लवकरच मशाल हाती घेणार?
2
वैवाहीक बलात्कार गुन्हा नाही तर सामाजिक समस्या; सुप्रीम कोर्टात केंद्र सरकारची स्पष्टोक्ती
3
रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरला, ‘फादर ऑफ ऑल बॉम्ब’ चा वापर केल्याचा दावा! बघा धडकी भरवणारा VIDEO
4
Rohit Pawar Rohit Sharma, Viral VIDEO: रोहित पवार म्हणाले- "हमको और एक वर्ल्ड कप चाहिए", मग रोहित शर्माने काय केलं?
5
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना खूशखबर, ५ तारखेला खात्यात जमा होणार ४ हजार रुपये
6
"जरांगेंनी पाडापाडीचं राजकारण करण्यापेक्षा उमेदवारांना निवडून आणावं’’,संभाजीराजेंचा सल्ला
7
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ठाणे दौरा, शहरातील वाहतुकीमध्ये बदल
8
"आधी स्वतःची परिस्थिती पाहा..." धार्मिक स्वातंत्र्याबाबत अमेरिकेच्या टीकेवर भारताचा पलटवार
9
इराणमध्ये विषारी दारू प्यायल्यानं २६ जणांचा मृत्यू, १०० हून अधिक जण रुग्णालयात दाखल
10
"त्याचा लहान भाऊ म्हणून...", छोटा पुढारीने सूरज चव्हाणबाबतीत दिला मोठा शब्द
11
महाराष्ट्रातील क्रीडारत्नांचा सन्मान! अविनाश साबळेला शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार, प्रदीप गंधेंना 'जीवन गौरव'
12
इस्रायलचे गाझावर भीषण हवाई हल्ले; हमास प्रमुख रावी मुश्ताहा याच्यासह तीन टॉप कमांडर ठार
13
त्वेशा जैनने पटकावली दोन रौप्यपदकं! राज्य बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत केली चमकदार कामगिरी
14
"राहुल गांधींनी काँग्रेसमध्येही ड्रग्सचा धंदा सुरू केलाय का?"; अनुराग ठाकूर यांचा खोचक सवाल
15
Rohit Sharma लिलावात आल्यास RCB ने संधी सोडू नये; दिग्गजाचं मोठं विधान, हिटमॅनलाही सल्ला
16
Gunratna Sadavarte : गुणरत्न सदावर्ते विधानसभेच्या रिंगणात, आदित्य ठाकरेंविरोधात निवडणूक लढणार!
17
“अक्षय शिंदेच्या बेड्या का काढल्या, फॉरेन्सिक रिपोर्टचे काय?”; हायकोर्टाचे प्रश्नांवर प्रश्न
18
Womens T20 World Cup 2024 : ती एकटी पडली; बांगलादेश संघाची विजयी सलामी!
19
“...तर ती देवेंद्र फडणवीसांच्या कारकिर्दीतील मोठी चूक असेल”; मनोज जरांगेंचा पुन्हा इशारा
20
Womens T20 World Cup: 'ब्लॅक बेल्ट' आहे हिजाब घालून मैदानात उतरलेली ही महिला क्रिकेटर

‘इनकमिंग’ गणपतीचे, ‘आऊटगोर्इंग’ गुंडांचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2019 6:00 AM

सीआरपीसी कलम १०७ नुसार नऊ हजार ५४९ केसेस, सीआरपीसी कलम ११० नुसार ४३९ केसेस, सीआरपीसी कलम १४४ नुसार ४३७, मुंबई दारुबंदी कायद्यातील कलम ९३ नुसार ५५७ केसेस करण्यात आल्या आहेत. याशिवाय मुंबई पोलीस कायद्यातील कलम ५५, ५६, ५७ यानुसार ९१ सक्रिय गुंडांच्या तडीपारीचे प्रस्ताव तयार करण्यात आले आहे.

ठळक मुद्देपोलीस ‘विघ्नहर्ते’ : तडीपारीचे ९१ प्रस्ताव, चौघांवर एमपीडीए, ११ हजारांवर प्रतिबंधात्मक कारवाई

सुरेंद्र राऊत ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यातील सण-उत्सव शांततेत पार पडावे यासाठी पोलिसांकडून प्रतिबंधात्मक कारवाईची धडक मोहीम राबविण्यात आली. प्रतिबंधात्मक कारवाईची निरंतर प्रक्रिया सुरू होती. या अंतर्गत सीआरपीसीच्या कलमान्वये व दारूबंदी कायद्यानुसार दहा हजार ९८२ जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली. शिवाय ९१ जणांच्या तडीपारीचा प्रस्ताव तयार केला आहे. तर चार जणांविरुद्ध एमपीडीएची कारवाई केली. सहा प्रस्ताव निर्णय प्रक्रियेत आहे.जिल्ह्यातील ३१ पोलीस ठाणे व सहा उपविभागातून सक्रिय गुन्हेगारांची कुंडली गोळा करण्यात आली. त्या आधारावरच प्रतिबंधात्मक कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. यामध्ये सीआरपीसी कलम १०७ नुसार नऊ हजार ५४९ केसेस, सीआरपीसी कलम ११० नुसार ४३९ केसेस, सीआरपीसी कलम १४४ नुसार ४३७, मुंबई दारुबंदी कायद्यातील कलम ९३ नुसार ५५७ केसेस करण्यात आल्या आहेत. याशिवाय मुंबई पोलीस कायद्यातील कलम ५५, ५६, ५७ यानुसार ९१ सक्रिय गुंडांच्या तडीपारीचे प्रस्ताव तयार करण्यात आले आहे. एमपीडीए अंतर्गत चार जणांवर कारवाई करण्यात आली. तर सहा जणांविरुद्ध एमपीडीए प्रस्ताव तयार केले असून निर्णय प्रक्रियेत आहेत. सीआरपीसीच्या कलम १५१ (३) नुसार दोन जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. सण-उत्सवाच्या काळात रेकॉर्डवरील सक्रिय गुन्हेगारांना स्थानबद्ध करण्याचे प्रस्ताव यात अंतर्भुत आहेत. एकंदरच गणपती, मोहरम, दुर्गा उत्सव व इतर धार्मिक सण शांततेत पार पडावे यासाठी ठोस उपाययोजना करण्यात आल्या आहेत.जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी प्रत्येक महिन्याच्या क्राईम मिटींगमध्ये प्रतिबंधात्मक कारवाईवर विशेष फोकस केला. परिणामी इतक्या मोठ्या प्रमाणात केसेस करणे शक्य झाले. पेट्रोलिंग, गस्त या पेक्षाही प्रतिबंधात्मक कारवाई गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरणारी आहे. त्यानुसारच नियोजन करण्यात आले आहे. सण-उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी सर्वच पोलीस ठाण्यांतर्गत जातीय सलोखा कार्यक्रम घेण्यात आले. जिल्ह्यात १ जानेवारी ते ३१ आॅगस्टपर्यंत ५९ कार्यक्रम झाले. शांतता समितीच्या २०९ बैठका घेण्यात आल्या. पोलीस मित्र समितीच्या १८१, गणपती मंडळाच्या २९८ अशा विविध प्रकारच्या ७४७ बैठका झाल्या आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक आणि त्या विभागातील उपअधीक्षक यांच्या उपस्थितीत ठाणेदारांनी या बैठका घेतल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने ठिकठिकाणी घेतलेल्या बैठकांचा आता सकारात्मक परिणाम दिसू लागला आहे.उत्सवात नागरिकांनीही सहकार्य करावे - एसपीगणपती उत्सवात सहा उपविभागीय पोलीस अधिकारी, वनरक्षक, २२ पोलीस निरीक्षक, १०८ सहायक पोलीस निरीक्षक, १ हजार ९९३ कर्मचारी, होमगार्ड ७०० पुरुष व २०० महिला, एसआरपीएफची एक कंपनी व दोन प्लाटून याशिवाय एसपीओचे एक हजार ३८१ जवान तैनात केले जाणार आहे. मोहरम आणि गणपती विसर्जनासाठी याचे नियोजन करण्यात आले आहे. ऐनवेळेवर जिल्ह्यातून २२ पोलीस उपनिरीक्षक पदोन्नतीने बाहेर गेले. त्यांच्या रिक्त जागेवर अद्याप तरी अधिकारी आलेले नाहीत. त्यानंतरही बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे. कुठेही अनुचित प्रकार होणार नाही याची पुरेपूर दक्षता घेण्यात आल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी सांगितले. सण-उत्सवात नागरिकांनीही सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

 

टॅग्स :Policeपोलिस