लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : संशोधन कार्यात शिक्षकांचा सहभाग वाढावा, पीएचडी अभ्यासक्रमाद्वारे दर्जेदार संशोधनावर भर दिला जावा, असे मार्गदर्शन येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात विभाग प्रमुख, समन्वयकांच्या बैठकीत करण्यात आले.महाविद्यालयाचे शैक्षणिक गुणवत्ता सल्लागार तथा आॅल इंडिया कौन्सिल फॉर टेक्नीकल एज्यूकेशनचे (एआयसीटीई) माजी अध्यक्ष डॉ. एस.एस. मंठा व चमू, एआयसीटीईचे माजी सल्लागार डॉ. एस.जी. भिरूड व सिम्बायोसिस इंस्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजीचे डायरेक्टर डॉ. केतन कोटेचा यांनी जेडीआयईटीला भेट दिली. यावेळी प्राचार्य, विभाग प्रमुख आणि समन्वयकांची बैठक घेण्यात आली.या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जेडीआयईटीचे संस्थापक अध्यक्ष तथा लोकमत एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा होते. संस्थेचे अध्यक्ष देवेंद्र दर्डा, सचिव किशोर दर्डा, लोकमत मीडिया प्रा.लि.चे वित्तीय प्रमुख मोहन जोशी, लव दर्डा यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.महाविद्यालयात विद्यार्थ्यांना अद्यावत औद्योगिक प्रशिक्षणाची व्यवस्था करावी, कॅम्पस प्लेसमेंट तसेच महाविद्यालयातील व्यवसायाभिमुख पायाभूत सुविधा वाढविणे आदी विषयांवर चर्चा करून विविध सूचना यावेळी देण्यात आल्या. डॉ. एस.जी. भिरूड यांनी महाविद्यालयाचा शैक्षणिक दर्जा वाढविण्यासंबंधी महत्त्वपूर्ण सूचना केल्या.डॉ. केतन कोटेचा यांनी शैक्षणिक क्षेत्रात विविध नावीन्यपूर्ण कौशल्याभिमुख टिप्स दिल्या. यावेळी प्राचार्य डॉ. रामचंद्र तत्त्ववादी यांनी महाविद्यालयाची माहिती व विकास अहवाल सादर केला.टॉप प्रायव्हेट इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटजवाहरलाल दर्डा इन्स्टिट्यूट आॅफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीला नॅक मानांकन मिळाले आहे. टॉप प्रायव्हेट इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट आॅफ इंडिया हा अवॉर्डही प्राप्त झाला आहे. २०१७ मध्ये इनोव्हेटर अँड रिसर्चर इंटरनॅशनल फोरम अमेरिकाने (आयआरआयएफ) ग्रेड-ए हा अवॉर्ड महाविद्यालयातील विविध व अद्यावत सोयीसुविधा विचारात घेऊन दिला आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.शिक्षणतज्ज्ञ व सक्षम प्रशासकएआयसीटीईचे माजी अध्यक्ष डॉ. एस.एस. मंठा हे शिक्षणतज्ज्ञ व सक्षम प्रशासक आहे. सध्या ते बंगलोर येथील नॅशनल इंस्टिट्यूट आॅफ अॅडव्हान्स स्टडीज या नामवंत संस्थेचे एॅडजक्ट प्रोफेसर आहे. डॉ. एस.जी. भिरूड हे व्हीजेटीआय मुंबई येथे कॉम्प्यूटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विभागात प्राध्यापक, मुंबई विद्यापीठाचे रजिस्ट्रार, तर आॅल इंडिया कौन्सिल फॉर टेक्नीकल एज्यूकेशनचे सल्लागार होते. डॉ. केतन कोटेचा हे सिम्बायोसिस इंस्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजीचे डायरेक्टर आहे. शिवाय सिम्बायोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीच्या इंजिनिअरिंग विभागाचे डीन आहेत.
संशोधन कार्यात शिक्षकांचा सहभाग वाढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2019 10:21 PM
संशोधन कार्यात शिक्षकांचा सहभाग वाढावा, पीएचडी अभ्यासक्रमाद्वारे दर्जेदार संशोधनावर भर दिला जावा, असे मार्गदर्शन येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात विभाग प्रमुख, समन्वयकांच्या बैठकीत करण्यात आले.
ठळक मुद्देतज्ज्ञांचे मार्गदर्शन : ‘जेडीआयईटी’ला एआयसीटीई माजी अध्यक्ष व सल्लागारांची भेट