२०१८ मध्ये हैदराबाद येथील एका सिमेंट कंपनीचे व्यवस्थापक पंकज पाटणी यांनी वसंतनगर पोलीस ठाण्यात सिमेंट घोटाळ्याची तक्रार दिली होती. यात विक्रमसिंह बिसेन रा. नांदेड व संजय रामेश्वर भंडारी रा. पुसद हे मुख्य आरोपी आहेत. या दोघांनी डीलरला सिमेंटची विक्री न करता बोगस बिल कंपनीकडे सादर करून ९७ लाखांची फसवणूक केली. या दोघांविरुद्ध २०१८ मध्ये वसंतनगर पोलीस ठाण्यात ४२० चा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तीन वर्षांपासून आरोपी पोलिसांच्या मोकाट होते. उपविभागीय पोलीस अधिकारी अनुराग जैन यांच्या आदेशानुसार या घोटाळ्याचे प्रकरण शहर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आले. नंतर शहरचे ठाणेदार दिनेशचंद्र शुक्ला यांनी आरोपी संजय रामेश्वर भंडारी (५५) याला मोतीनगरातील राहत्या घरून अटक केली. त्याला १ जुलैपर्यंत पीसीआर मिळाला होता. त्यानंतर आरोपीचा पीसीआर पाच दिवसांनी वाढविण्यात आला. आरोपी कापड व्यापारी, पेट्रोल पंप, बिल्डरच्या व्यवसायात असल्याचे पोलिसांनी सांगितले.