शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

शेतीत आधुनिक यंत्रांचा वाढतोय वापर

By admin | Published: April 17, 2017 12:25 AM

बैलजोड्यांच्या वाढलेल्या किंमती, मजुरांची कमी झालेली संख्या व मजुरीचे वाढलेले दर यामुळे शेतकरी आता शेतीसाठी...

मजुरांचा अभाव : पेरणी ते कापणी सर्वच यंत्रे बाजारात उपलब्ध, ट्रॅक्टरचा मोठा आधार अखिलेश अग्रवाल  पुसद बैलजोड्यांच्या वाढलेल्या किंमती, मजुरांची कमी झालेली संख्या व मजुरीचे वाढलेले दर यामुळे शेतकरी आता शेतीसाठी पारंपरिक अवजाराबरोबरच आधुनिक यंत्रण वापरावर भर देत आहे. आता बाजारात पेरणी ते कापणीपर्यंतची सर्वच यंत्रे बाजारात विक्रीस उपलब्ध झाली आहेत. शेतीच्या कामासाठी बैलजोडीचा प्रामुख्याने वापर केला जातो. मात्र आता बांधापर्यंत शेती करण्याची पद्धत सुरू झाल्याने चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतीत काम करणाऱ्या सालगड्याची कमतरता भासत असल्याने बहुतांश शेतकरी शेतीची कामे ट्रॅक्टरच्या सहाय्याने करण्यावर भर देत आहेत. मशागतीच्या कामापासून पेरणी, निंदणी, कापणी आदी कामे ट्रॅक्टरच्या सहाय्याने केली जात आहेत. रोजंदारीची कामे करण्यास कोणी धजावत नसल्याने शेतकरी मेटाकुटीला येत आहेत. त्यामुळे आधुनिक पद्धतीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांकडून शेतात यांत्रिकीकरणाचा वापर वाढला आहे. झटपधट कामे होत असल्याने अनेक शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरची खरेदी करून त्यावर मशागतीच्या कामासह पेरणी, डवरणी, कापणी, मळणीसाठी लागणाऱ्या उपकरणाची खरेदी केली जात आहे. या उपकरणात पंजी, रोटाव्हेटर, फाळ, नांगर, पेरणीयंत्र, मळणीयंत्र, कापणी यंत्र यांचा समावेश आहे. ट्रॅक्टरच्या मदतीने मशागतीची कामे करून शेतजमिनीचे सपाटीकरण केल जाते. त्यानंतर त्यावर पंजी करून सध्या यंत्राच्या सहाय्याने पेरणीसाठी मशागतीची कामे सुरू आहेत. बैलजोडीच्या सहाय्याने एक एकर जमिनीची मशागत करण्यासाठी आठ दिवसांचा कालावधी लागतो तसेच दोन मजूर लागतात. परंतु ट्रॅक्टरच्या मदतीने सर्व कामे कमी वेळात झटपट होत असल्याने शेतात यांत्रिकीकरणाचा वापर वाढला आहे. नांगरणीसाठी तेराशे व चौदाशे रुपये एकरी घेतले जात आहेत. यामुळे ट्रॅक्टर चालकांचा व्यवसाय तेजीत सुरू झाला आहे. ट्रॅकटरसाठी चार ते पाच दिवसांपूर्वी बुकींग करावी लागत आहेत. मशागतीसाठी ट्रॅक्टरचा वापर वाढल्याने सर्वच शेतकरी त्याचा वापर करीत असल्याने ट्रॅक्टर चालकाचा व्यवसाय तेजीत सुरू आहे. ज्यांच्याकडे ट्रॅक्टर आहे त्यांनी सध्या नांगरणी करणे सुरू केले असल्याचे ट्रॅक्टर चालक सांगतात.