रूपेश उत्तरवार।ऑनलाईन लोकमत यवतमाळ : शहराच्या मध्यवस्तीतील जुन्या महिला रूग्णालय परिसरात १०० खाटांचे स्वतंत्र स्त्री रूग्णालय निर्माण करण्यात येणार आहे. त्यासाठी शासनाने १८ कोटी रूपयांचा निधी मंजूर केला. बांधकामाच्या निविदा निघाल्या असून बांधकामाला सुरूवातही झाली आहे.येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा परिसर जिल्ह्यातील रूग्णांच्या सेवेसाठी अपुरा ठरत आहे. त्यामुळे जिल्ह्यासाठी स्वतंत्र नवीन स्त्री आणि नवजात शिशू रूग्णालय उभारले जात आहे. शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या जुन्या स्त्री रूग्णालयाची विस्तीर्ण जागा नवीन स्त्री रूग्णालयासाठी वापरली जात आहे. या परिसरात भव्य तीन मजली इमारत बांधली जात आहे. या रूग्णालयात महिलांच्या सर्व शस्त्रक्रियेपासून ते बालकांवरील सर्व उपचाराची सुविधा उपलब्ध राहणार आहे. नवीन स्त्री आणि नवजात शिशू रूग्णालयासाठी राज्य शासनाने १८ कोटी रूपयांचा निधी मंजूर केला असून बांधकामाच्या निविदा काढण्यात आल्या. नवीन वास्तूच्या बांधकामाला सुरूवातही झाली आहे. नागपूरच्या मेसर्स सादीक अॅन्ड कंपनीकडे बांधकाम सोपविण्यात आले आहे.शासकीय रूग्णालयावर पडणारा ताण कमी करण्यासाठी या नव्या स्वतंत्र स्त्री रूग्णालयाची निर्मिती केली जाणार आहे. यामुळे शासकीय वैद्यकीय रूग्णालयातील प्रसूती आणि महिलांच्या शस्त्रक्रियांचा भार कमी होणार आहे. सोबतच बालकांच्या आरोग्याची जबाबदारीही नवीन स्त्री रूग्णालयावर राहणार आहे. नवीन वास्तूत खालील मजल्यावर सर्व प्रकारची शासकीय कार्यालये राहतील. तेथे कॉन्फरन्स हॉल असणार आहे. औषधांची व्यवस्थाही वास्तूतच राहणार आहे. अद्ययावत पद्धतीने उभारल्या जाणाºया या रूग्णालयामुळे महिला रूग्णांची गैरसोय टळणार आहे.२०१९ पर्यंत पूर्णनागपूरच्या बांधकाम कंपनीसोबत शासनाने मार्च २०१९ पर्यंत रूग्णालयाचे संपूर्ण बांधकाम पूर्ण करण्याचा करार केला आहे. बांधकाम कंपनीने सध्या प्रत्यक्षात वास्तू बांधकामाला सुरूवात केली आहे. मार्च २०१९ पर्यंत वास्तूचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी कंपनीने हालचाल सुरू केली आहे.
१०० खाटांचे स्वतंत्र स्त्री रूग्णालय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2017 1:22 AM
शहराच्या मध्यवस्तीतील जुन्या महिला रूग्णालय परिसरात १०० खाटांचे स्वतंत्र स्त्री रूग्णालय निर्माण करण्यात येणार आहे. त्यासाठी शासनाने १८ कोटी रूपयांचा निधी मंजूर केला.
ठळक मुद्दे१८ कोटी मंजूर : जिल्हा शल्य चिकित्सकांची राहणार देखरेख