देवीदास घोडेस्वार : समता सैनिक दलाकडून व्याख्यानयवतमाळ : विविधतेने नटलेल्या भारत देशात जाती, धर्म व पंथ यांचे विविध प्रकार आहे. त्या सर्वांना समान न्यायाने बांधून भारताला एकात्म व अखंडित ठेवण्याचे कार्य संविधान करीत आहे. त्यामुळे भारतीय राज्यघटना आदर्श आहे, असे मत प्रा. देवीदास घोडेस्वार यांनी व्यक्त केले. समता सैनिक दलाच्यावतीने डॉ. आंबेडकर सांस्कृतिक सभागृह येथे माई रमाई जयंतीचा कार्यक्रम झाला. त्यावेळी ते प्रमुख वक्ता म्हणून बोलत होते. याप्रसंगी ‘माई रमाई प्रज्ञासूर्याची सावली’ या विषयावर प्रा. प्रमोद नारायणे यांनी भाष्य केले. माई रमाईचा त्याग, निष्ठा, कर्तव्य व जबाबदारी यांची उदाहरणे सांगितली. प्रा. देवीदास घोडेस्वार यांचे ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भारत राष्ट्र’ या विषयावर व्याख्यान झाले. ते म्हणाले, कुठलाही धर्मग्रंथ देशाचा कारभार चालवू शकत नाही. एक भारतीय म्हणून तुम्हाला भारतीय संविधानच समान हक्क, अधिकार व स्वातंत्र्य देवू शकते. प्रत्येक क्षेत्रातील कालबाह्य गोष्टी मागे टाकून आधुनिक कालसुसंगत व विज्ञानवादी विचारांची जोड देण्याची क्षमता भारतीय संविधानात आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अशोक ताकसांडे, संचालन देवीदास मुनेश्वर यांनी केले. अविनाश मनवर यांनी आभार मानले. (स्थानिक प्रतिनिधी)
भारतीय राज्यघटना आदर्श आहे
By admin | Published: February 10, 2017 1:53 AM