पुसद : आदिवासी समाजातील मुलामुलींसाठी वसतिगृह, प्रकल्प कार्यालय तसेच समाज भवनासाठी जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार इंद्रनील नाईक यांचा बिरसा मुंडा ब्रिगेडने महामानव बिरसा मुंडा चौक येथे सत्कार करून आदिवासी समाजाच्या वतीने आभार मानले.
जिल्ह्यातील आठ तालुक्यांमधील वाड्या, वस्त्या, गाव, शहरातील आदिवासी समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक प्रगतीसाठी आवश्यक असणाऱ्या मुलामुलींचे वसतिगृह, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय व बिरसा भवनसाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. जागा उपलब्ध करून देण्याचा शब्द आमदार इंद्रनील नाईक यांनी दिला होता. त्याची प्रतिपूर्ती म्हणून त्यांनी शहरातील उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयातलगतची जिजामाता कन्या शाळा परिसरातील जागा उपलब्ध करून दिली.
याबद्दल आमदार इंद्रनील नाईक यांचा आदिवासी समाजाच्या वतीने बिरसा मुंडा ब्रिगेडने सत्कर केला. त्यांचे बिरसा मुंडा ब्रिगेडच्या वतीने आभार मानण्यात आले. प्रथम महामानव बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस आमदार इंद्रनील नाईक यांच्यासह बिरसा मुंडा ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी पुष्पहार अर्पण करून मानवंदना दिली. यावेळी बिरसा मुंडा ब्रिगेडचे विदर्भ अध्यक्ष पांडुरंग व्यवहारे, तालुकाध्यक्ष मारोती भस्मे, मार्गदर्शक परशराम डवरे, सुरेश धनवे, जिल्हा परिषद सदस्य गजानन उघडे, आदिवासी सेवक रामकृष्ण चौधरी, अर्जुन हागवणे, गजानन भोगे, माणिक मोहकर, वसंत चिरमाडे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन मारोती भस्मे यांनी केले.
बॉक्स
सदैव आदिवासी समाजाच्या पाठीशी
आदिवासी समाजासाठी जागा उपलब्धतेनंतर आता जागा हस्तांतरणासह त्वरित प्रशासकीय मान्यता घेऊन इमारत उभी करण्यासाठी उद्घाटन कार्यक्रमाचे काम सुरु करू. त्यासाठी लागणारा निधी कमी पडू देणार नाही. यासोबतच सर्वच कामासाठी आदिवासी समाजाच्या सदैव पाठीशी राहू, अशी ग्वाही आमदार इंद्रनील नाईक यांनी दिली.