सुरेंद्र राऊत।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : टँकरमधून घरोघरी पोहोचणाऱ्या पाण्यामुळे शहरातील अनेक वस्त्यांमध्ये संसर्गाचे आजार बळावत आहे. अंगावर पुरळ, खाज आणि लालचट्टे दिसत असून नाईलाजाने टँकरचे पाणी प्राशन केल्याने पचनाचे विकार आणि जलजन्य आजाराची भीती निर्माण झाली आहे. टँकरचे पाणी तापवूनच वापरण्याचा सल्ला त्वचारोग तज्ज्ञांनी दिला आहे.यवतमाळ शहरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. महिनाभरानंतर येणाºया नळामुळे प्रत्येकालाच टँकरचे पाणी वापरावे लागत आहे. शहरातील जलस्रोत आटल्याने सांडपाण्याच्या नाल्यावरील विहिरींचे थेट पाणी टँकरमध्ये भरुन वितरित केले जाते. या विहिरींची निर्जंतुकीकरण न करताच पाणी वितरित होत आहे. परिणामी अनेक वस्त्यांमध्ये अॅलर्जिक आणि त्वचेच्या संसर्गाचे आजार बळावत आहेत.शहरातील वंजारीफैल, गवळीपुरा, शास्त्रीनगर, विठ्ठलवाडी, इंदिरानगर, पिंपळगाव या परिसरात नागरिकांना पुरळ, खाज, चट्टे झाल्याच्या तक्रारी वाढत आहे. अनेक भागात टँकरचे पाणी पिण्यासाठी वापरावे लागते. त्यामुळे जलजन्य आजाराची भीती निर्माण झाली आहे. यातून पचनाचे विकार जडले असून अनेकांना पाणी पिल्यानंतर मळमळ, उलट्या आणि हगवणीचा त्रास होत आहे.टँकरद्वारे येणाºया पाण्याला उग्र वास येतो. अनेक टँकरमधील पाणी हिरव्या रंगाचे असते. घरी पाणी साठविल्यानंतर दोन-तीन दिवसातच त्यात चामडोक पडतात. अनेक ठिकाणी तर साठविलेल्या पाण्यात शेपटी असलेल्या अळ्याही आढळून येतात. हेच पाणी आंघोळीसाठी आणि कपडे धुण्यासाठी वापरले जाते. त्यातून आजार पसरत आहेत.शहराच्या विविध भागातील नागरिकांकडून सातत्याने संसर्गजन्य आजार होत असल्याचे सांगितले जात आहे. वास्तविक टँकरमध्ये पाणी भरताना ते शुद्ध असते असे सांगितले जाते. मात्र टँकर वेळोवेळी साफ केले जात नसल्याने शुद्ध पाणीही त्यात दूषित होते. यातूनच नागरिकांना संसर्गजन्य आजार बळावत असल्याचे दिसून येते. यावर तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे.पाणी उकळूनच वापराटँकरद्वारे आलेले पाणी दूषित असल्यास वापरण्यापूर्वी ते उकळून घेणे गरजेचे आहे. पाणी तापविल्याने त्यातील बुरशी आणि जलजन्य आजाराला कारणीभूत ठरणारे घटक नाहीसे होतात. दररोज पाण्याचा वापर करण्यापूर्वी पाणी तापविणे शक्य नसल्यास काही काळ ते उन्हात गरम केल्यानंतर त्याचा वापर करावा. टँकरच्या पाण्याने धुतलेले कपडे कडक उन्हात वाळू द्यावे. यामुळे संसर्गाचा धोका पूर्णत: कमी करता येऊ शकतो.वापराचे व पिण्याच्या पाण्याचे एकच टँकरपाणी वितरणासाठी टँकर लावले असून पिण्याच्या पाण्यासाठी स्वतंत्र टँकरची व्यवस्था कुठेही दिसत नाही. वापराचे पाणी वितरण करणाºया टँकरमधूनच पिण्याचे पाणीही दिले जाते. यामुळे शुद्ध असलेले पिण्याचे पाणी अशुद्ध टँकरमध्ये सोडताच दूषित होते. यातूनही जलजन्य आजाराचा धोका निर्माण झाला आहे.
टँकरच्या पाण्याने संसर्गाचे आजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2018 12:13 AM
टँकरमधून घरोघरी पोहोचणाऱ्या पाण्यामुळे शहरातील अनेक वस्त्यांमध्ये संसर्गाचे आजार बळावत आहे. अंगावर पुरळ, खाज आणि लालचट्टे दिसत असून नाईलाजाने टँकरचे पाणी .....
ठळक मुद्देपाणी टंचाईचा परिणाम : अंगावर पुरळ, खाज, लालचट्टे, पचनाचे आजार, उलट्या आणि हगवण