लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : उन्हाचे चटके जाणवताच गाडीमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा वर्ग वातानुकूलीत वाहनांकडे वळला आहे. परिवहन महामंडळाकडे एसी गाड्या असल्या तरी त्यामध्ये प्रवासी बसायला तयार नाहीत. शिवशाहीचा प्रवास महाग असल्याची ओरड प्रवासी करीत आहेत. यवतमाळ जिल्ह्यात २३ शिवशाही बसेस आहेत. याशिवाय स्लिपर कोच गाड्यांचाही समावेश आहे. या गाड्यांना अधिक प्रवासी मिळावे म्हणून नियोजन करण्यात आले आहे. परंतु, प्रवाशांचा कल खासगी वाहनांकडेच वाढलेला दिसत आहे. यातून ट्रॅव्हल्सचालकांना चांगले दिवस आले आहे, तर एस.टी.कडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्याही कमी झाली आहे. एस.टी.च्या संपाने हे चित्र निर्माण झाले असून, स्थिती बदलण्यासाठी मोठा वेळ लागणार आहे.
२३ शिवशाही बसेस राज्य मार्गावर धावणार- उन्हाचा वाढता चटका पाहता राज्य परिवहन महामंडळाने लांब पल्ल्यासाठी शिवशाही बसेस चालविण्याचे नियोजन तयार केलेले आहे. त्याकरिता २३ बसेस सज्ज आहेत. - यवतमाळ ते नागपूर मार्गासाठी दहा बसेस आरक्षित ठेवण्यात आलेल्या आहेत. यवतमाळ ते अमरावती मार्गासाठी दहा बसेस आहेत. यवतमाळ-पुणे आणि पुसद-पुणे या मार्गासाठी तीन स्लिपर कोचचे नियोजन आहे.
सर्वच मार्गांवर ट्रॅव्हल्सला चांगले दिवस एस.टी.च्या संपापासून ट्रॅव्हल्स मालकांचे अच्छे दिन सुरू झाले आहेत. सर्वच मार्गांवर ट्रॅव्हल्सला भरगच्च प्रवासी मिळत आहेत. खास करून लांब पल्ल्यांच्या गाड्यांसाठी ट्रॅव्हल्सचा प्रवास पसंत केला जात आहे. यातून गर्दी वाढली आहे.
एसटीचा दिवसा प्रवास नको रे बाबाएसटीच्या फेऱ्या मोजक्याच आहेत. त्यातही भर उन्हात प्रवास केला तर प्रवास करणाऱ्या प्रवाशालाच उन लागल्याशिवाय राहात नाही. यातून प्रवासी दूर आहे.
४२ अंशावर गेला पाराजिल्ह्याचा पारा ४२ अंशावर गेला आहे. रस्त्याने जाताना उन्हाचे चटके जाणवतात. यामुळे वातानुकुलीत प्रवास होत आहे.