शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

देशभरातील शाळांची माहिती होणार ऑनलाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 13:38 IST

देशभरातील सुमारे १५ लाख शाळांची इत्यंभूत माहिती या पुढील काळात एका क्लिकवर उपलब्ध असणार आहे.

ठळक मुद्देयु-डायस प्लस १५ मेपर्यंत डाटा अपटेड करण्याचे आदेश

अविनाश साबापुरे।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : देशभरातील सुमारे १५ लाख शाळांची इत्यंभूत माहिती या पुढील काळात एका क्लिकवर उपलब्ध असणार आहे. त्या दृष्टीने प्रत्येक शाळेची माहिती यु-डायस प्लस या पोर्टलवर संगणकीकृत करण्याचे आदेश मनुष्यबळ विकास मंत्रालयाने दिले आहे.पहिली ते बारावीपर्यंतच्या प्रत्येक शाळा या पोर्टलवर नोंदविणे बंधनकारक आहे. एखाद्या शाळेला शासनाची मान्यता नसेल तरीही त्या शाळेची माहिती पोर्टलवर भरावी लागणार आहे. शाळा, शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांसाठी आजपर्यंत यु-डायसवरील आकडेवारी विचारात घेतली जात होती. मात्र आता मनुष्यबळ विकास मंत्रालयाअंतर्गत काम करणाºया दिल्ली येथील नॅशनल इन्फरमेटिक सेंटरने यु-डायस प्लस हे पोर्टल विकसित केले आहे. त्यावर सर्व शाळांची माहिती अपडेट करण्याची जबाबदारी शाळा पातळीवरील कर्मचाऱ्यांना सोपविण्यात आली आहे.पुढील महिन्यात २०१९-२० या सत्रातील योजनांचे समग्र शिक्षा अभियानाचे अंदाजपत्रक जाहीर होण्याची शक्यता आहे. त्या अंदाजपत्रकासाठी २०१८-१९ या सत्रातील पटसंख्या व अन्य आकडेवारी गृहित धरली जाणार आहे. मात्र ही आकडेवारी यु-डायस प्लस पोर्टलवरुन घेतली जाणार आहे. त्यामुळे पोर्टलवर १५ मेपर्यंत माहिती भरण्याचे आदेश देण्यात आले आहे.महाराष्ट्रात पहिली ते बारावीपर्यंतचे वर्ग असलेल्या जवळपास एक लाख नऊ हजार शाळा आहेत. त्या प्रत्येक शाळेची भौतिक सोई-सुविधांसह, कर्मचारी वर्ग व पटसंख्या अशी इत्यंभूत माहिती भरली जाणार आहे. त्यासाठी तंत्रस्नेही शिक्षकांची मदत घेतली जाणार आहे.यु-डायस प्लस पोर्टलवर माहिती भरण्यासाठी जिल्हास्तरावर कार्यशाळा घेण्यात आली आहे. तसेच तालुकास्तरावर गटशिक्षणाधिकारी यांचे लॉगिनही करून दिले आहे. केंद्र प्रमुख, विस्तार अधिकारी, गटशिक्षणाधिकारी अशा विविध पातळ्यांवर माहिती तपासूनच अंतिम केली जाणार आहे. विविध शिष्यवृत्त्या, मध्यान्ह भोजन योजना व इतर योजनांसाठी ही माहिती वापरली जाणार आहे.- डॉ. सुचिता पाटेकरशिक्षणाधिकारी, यवतमाळ.

टॅग्स :Schoolशाळा