लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहरातील विकास कामे करताना ती नियमानुसारच व्हावी, ही भूमिका सुरुवातीपासून राहिली आहे. याची अडचण होत असल्याने पालकमंत्र्यांकडून वारंवार अडवणूक केली जाते. भाजपातील कंत्राटदारांना किंवा पदाधिकाऱ्यांना काम देण्यासाठी हा विरोध सुरू आहे, असा आरोप नगराध्यक्ष कांचन चौधरी यांनी मंगळवारी झालेल्या पत्रपरिषदेत केला.नगराध्यक्ष कांचन चौधरी यांनी दीड वर्षात घेतलेल्या निर्णयांचा लेखाजोखा यावेळी मांडला. शहरात नव्याने आलेल्या सात ग्रामपंचायतींसाठी ३५० कोटींचा विकास आराखडा तयार केला. त्यातील ५० कोटींची शासनाकडे मागणी केली. प्रत्यक्ष १४ कोटी प्राप्त झाले. ही कामे मंजूर झाले असून पालकमंत्र्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे दिली आहे. अखर्चित निधीचा महत्वाचा प्रश्न होता. २०१४ ते २०१६ या कालावधीतील विविध स्वरूपाचा ४४ कोटींचा निधी अखर्चित होता. त्यातील दहा कोटींची कामे प्रस्तावित केली होती. ती अत्यंत संथगतीने सुरू होती. शोध घेतला असता भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष यांच्या मुलाच्या नावाने यातील बहुतांश कामाचे कंत्राट आहे. याशिवाय सत्ताधारी पक्षातील पदाधिकाºयांनी दुसऱ्याच्या नावाने कामे घेतली आहे. या कामांना गती देण्याचा आपला प्रयत्न आहे. ३० कोटींच्या कामास प्रशासकीय वित्तीय मंजुरी घेतली आहे.नेहरु बाल उद्यानात तीन कोटी ३० लाखांचे तारांगण मंजूर झाले आहे. स्वातंत्र्य दिनी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत त्याचे भूमिपूजन झाले. अमृतमधील पाणीपुरवठा योजनेचे श्रेय लाटणाºयांनी टक्केवारीच्या चढाओढीत निकृष्ट दर्जाचे काम केले व जनतेच्या समस्येकडे दुर्लक्ष केले. मोठा गाजावाजा करून ज्यांनी तारखा दिल्या, त्यासुद्धा निष्फळ ठरल्या. भिष्म प्रतिज्ञा घेऊन दुसऱ्यांना शुक्राचार्य संबोधणारे आता स्वत: शुक्राचार्य ठरले आहे. आम्ही जनतेला पाणी देऊन भिष्म आहोत. या कामात भ्रष्टाचाराची जाणीव होताच ५ मे रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे व त्यानंतर २१ जूनला मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करून कामाच्या चौकशीची मागणी केली. पालकमंत्र्यांनी बेंबळाच्या कामात मर्जीतील पोट कंत्राटदार नेमले यात बहुतांश भाजपाचेच ठेकेदार आहेत. योजनेचे काम फसल्याने पालकमंत्र्यांची मुख्यमंत्र्यांसमोर नाचक्की झाली. त्यामुळे आता ते जनतेपुढे नगराध्यक्षांविरोधात दुजाभाव निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. यावर्षी नगरपरिषदेच्या वृक्षारोपण कार्यक्रमापासून नगराध्यक्षांनाच दूर ठेवण्याचे षडयंत्र रचले. प्रत्येक ठिकाणी अडवणूक करून कामात अडथळे निर्माण केले जात आहे. यासाठी पालकमंत्र्यांनी नगरपरिषदेत त्यांचे काही भाट जे बोलक्या पोपटांसारखे वागत आहे. अशांना मी विकास कामातूनच उत्तर देईल, असेही कांचन चौधरी यांनी सांगितले.महिला पदाधिकाऱ्यांचा उपमर्दसार्वजनिक व शासकीय कार्यक्रमात, बैठकीत पालकमंत्री हे महिला पदाधिकाºयांचा उपमर्द करतात, यात जिल्ह्यातील भाजपा व्यतिरिक्त असलेल्या महिला पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. नियोजन समितीच्या बैठकीत तर पालकमंत्री स्वपक्षातील आमदारांनाही बोलू देत नाही. पालकमंत्र्यांकडून किमान महिला पदाधिकाऱ्यांचा व नगराध्यक्षांचा सन्मान व्हावा, एवढी अपेक्षा असल्याचे कांचन चौधरी यांनी सांगितले.विकास कामे व निधीच्या नियोजनासाठी नगराध्यक्ष, मुख्याधिकाºयांची नेहमीच संयुक्त बैठक घेतो. पालकमंत्री म्हणून अशी बैठक घेण्याचा प्रघात जिल्ह्यात मीच पहिल्यांदा सुरू केला आहे. मला कुठलंही राजकारण करायचं नाही. विकास कामे करायची आहेत. बेंबळाच्या कंत्राटदाराला आतापर्यंत फक्त दोनवेळा भेटलो आहे. कंत्राटदाराला मिळालेले काम त्यालाच करायचं आहे. आतापर्यंत कंत्राटदाराच्या कोण भेटी घेत आलंय हे सर्वश्रूत आहे. नगरपरिषदेच्या अखर्चित निधीला सलग दोन वर्षांपासून मुदत वाढवून दिली आहे. प्रधानमंत्री आवास योजनेसाठी प्रयत्नरत आहे.- मदन येरावार,पालकमंत्री, यवतमाळ
भाजपातील कंत्राटदारांसाठी पालकमंत्र्यांकडून अडवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2018 12:07 AM
शहरातील विकास कामे करताना ती नियमानुसारच व्हावी, ही भूमिका सुरुवातीपासून राहिली आहे. याची अडचण होत असल्याने पालकमंत्र्यांकडून वारंवार अडवणूक केली जाते. भाजपातील कंत्राटदारांना किंवा पदाधिकाऱ्यांना काम देण्यासाठी हा विरोध सुरू आहे, असा आरोप नगराध्यक्ष कांचन चौधरी यांनी मंगळवारी झालेल्या पत्रपरिषदेत केला.
ठळक मुद्देकांचन चौधरींचा आरोप : पत्रपरिषदेत मांडला दीड वर्षाचा लेखाजोखा