शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
तेलंगणा सरकारने अदानी समूहाची १०० कोटींची देणगी नाकारली, कारण...
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
4
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
5
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
6
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
7
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
8
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
9
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
10
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
11
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
12
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
13
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
14
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
15
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
16
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
17
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
18
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
19
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
20
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."

अन् त्यांनी जिल्हा परिषद अध्यक्षांच्या खुर्चीवर फेकली शाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2021 5:49 PM

जिल्हा परिषद स्थायी समितीची सभा तहकूब झाल्याने संतापलेल्या माजी उपाध्यक्षाने थेट अध्यक्षांच्या कक्षात शिरून त्यांच्या खुर्चीवर शाई फेकली.

यवतमाळ : जिल्हा परिषद स्थायी समितीची सभा तहकूब झाल्याने संतापलेल्या माजी उपाध्यक्षाने थेट अध्यक्षांच्या कक्षात शिरून त्यांच्या खुर्चीवर शाई फेकली. ही घटना गुरुवारी दुपारी १.४० वाजण्याच्या सुमारास घडली.

गुरुवारी स्थायी समितीची सभा आयोजित करण्यात आली होती. दुपारी १ वाजता होणाऱ्या सभेला केवळ दोन सदस्य उपस्थित होते. अर्धा तास प्रतीक्षा केल्यानंतरही गणपूर्ती झाली नाही. त्यामुळे सभेचे सचिव अरविंद गुडधे यांनी सभा तहकूब झाल्याचे घोषित केले. यामुळे संतापलेल्या माजी उपाध्यक्षाने लगेच अध्यक्षांचा कक्ष गाठून त्यांच्या खुर्चीवर शाई फेकली. ही शाई आजूबाजूच्या प्रतिमांवरही उडाली. त्यानंतर ते निघून गेले. सीईओ, डेप्युटी सीईओ आदींनी या घटनेची पाहणी केली.

महाराष्ट्र आणि जिल्हा परिषदेत सत्ता गमावल्यामुळे भाजप सदस्याने नैराश्यातून केलेले हे कृत्य निंदनीय असल्याचे अध्यक्ष कालिंदा पवार यांनी म्हटले आहे. खुर्चीवर शाई फेकताना ती छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आणि राष्ट्रीय ध्वजावरसुद्धा उडाली. त्यामुळे राष्ट्रध्वज व शिवरायांचा अपमान झाल्याने आपण या घटनेचा निषेध करीत असल्याचे कालिंदा पवार यांनी सांगितले.

टॅग्स :zpजिल्हा परिषदPoliticsराजकारण