यवतमाळ : अण्णाभाऊ साठे विकास महामंडळातील बहुचर्चित कोट्यवधी रुपयांच्या अनुदान वाटप घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) गुरुवारी महामंडळाच्या यवतमाळातील कार्यालयाची तपासणी केली. अण्णाभाऊ साठे महामंडळातील घोटाळा ‘लोकमत’नेच उघडकीस आणला. या घोटाळ्याची सीआयडीच्या पुणे मुख्यालयातील आर्थिक गुन्हे शाखेमार्फत चौकशी सुरू आहे. अमरावती विभागात बुलडाणा येथे या प्रकरणी गुन्हा दाखल आहे. शिवाय सीआयडीच्या पाचही जिल्ह्यातील चमूने साठे महामंडळाच्या त्या-त्या जिल्ह्यातील कार्यालयात लाभार्थ्यांची यादी व अनुदान वाटपाची तपासणी करून त्याचा अहवाल पुणे मुख्यालयाला पाठविला असल्याची माहिती सीआयडीचे उपअधीक्षक सोळंके (अमरावती) यांनी ‘लोकमत’ला दिली. गुरुवारी महामंडळाच्या यवतमाळातील कार्यालयातही सीआयडीच्या चमूने तपासणी केली. (कार्यालय प्रतिनिधी)
सीआयडीची साठे महामंडळ कार्यालयात तपासणी
By admin | Published: August 19, 2016 1:11 AM