वंडली : बळीराजा चेतना अभियान, भजनाच्या माध्यमातून जागृतीकळंब : वंडली येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेत बळीराजा चेतना अभियानांतर्गत विविध कार्यक्रम घेण्यात आले. याअंतर्गत घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेत जिल्हा परिषद हायस्कूलची विद्यार्थिनी प्रेरणा शरद शंभरकर हिने प्रथम क्रमांक पटकाविला.द्वितीय क्रमांक दर्शना जनार्धन कासार व सुयोग होले यांनी संयुक्तपणे पटकावला. तृतीय क्रमांक जयश्री पिसाळकर तर प्रोत्साहनपर बक्षीस वृषभ मोकळे यांना मिळाले. ‘शेतकरी आत्महत्या, कारणे व उपाय’ हा स्पर्धेचा विषय होता. परीक्षक म्हणून अँड फिडेल बायदानी व अमोल कडूकर यांनी काम पाहिले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रवीण देशमुख होते. प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार संतोष काकडे, पंचायत समिती सदस्य विजय सुटे, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष बालू पाटील दरणे, पणन महासंघाचे संचालक सुरेश चिंचोळकर, सरपंच मनीषा मांढरे, गटविकास अधिकारी डॉ.मनोहर नाल्हे, सहायक गटविकास अधिकारी पद्माकर मडावी, शिक्षण विस्तार अधिकारी नितीन डाखोरे, उपसरपंच नंदा पारिसे, दिगांबर गाडगे महाराज, हभप गंगाधर घोटेकार, मुख्याध्यापक गिरिधर ससनकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजय अंदुरकर, शालेय पोषण आहार अधीक्षक वंदना नाईक आदी उपस्थित होते.यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ‘चेतना’ या हस्तलिखित पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी राळेगाव बळीराजा चेतना अभियान संचाच्यावतीने भजनाचा कार्यक्रम घेण्यात आला. शेतकरी आत्महत्येवर आधारित एक अंकी नाटिका सादर करण्यात आली. सायंकाळी दिगांबरराव गाडगे यांचा समाज प्रबोधन कार्यक्रम झाला. यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक गिरिधर ससनकर यांच्या मार्गदर्शनात स्मिता ढोले, प्रसेनजित पाटील, श्याम कामटकर, मारोती बेलखेडे, ग्रामसेवक प्रवीण सदावर्ते, ज्ञानेश्वर होरे, किशोर चौधरी, हरिदास कुबडे, वाल्मीक मेश्राम आदींनी पुढाकार घेतला. (तालुका प्रतिनिधी)
वक्तृत्व स्पर्धेत प्रेरणा शंभरकर पहिली
By admin | Published: February 06, 2016 2:42 AM