रूपेश उत्तरवार।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : रासायनिक खताची खरेदी केल्याने शेतकऱ्यांनाही सुरक्षा विमा मिळणार आहे. त्याकरिता खत कंपनी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहणार आहे. अपघात झाल्यास अशा शेतकऱ्यांना एक लाख रूपयापर्यंतची मदत कंपनीच देणार आहे. विशेष म्हणजे, खत खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यांचा विमा हप्ता खत कंपनीच अदा करणार आहे. यामुळे कृषी उत्पादनात वाढ करण्यासोबत शेतकऱ्यांचा संकटकालीन सारथी म्हणून खत कंपनी भूमिका बजावणार आहे.शासनाच्या मालकीची इफको ही खत कंपनी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरसावली आहे. खतांची खरेदी करणाºया शेतकऱ्यांना ही कंपनी एक लाख रूपयापर्यंतचा अपघात विमा देणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना कुठलेही पैसे मोजावे लागणार नाही. एका पोत्याच्या खरेदीवर चार हजार रूपयापर्यंतचा सुरक्षा विमा शेतकऱ्यांना मिळणार आहे. २५ पोत्यांवर एक लाख रूपयांचा सुरक्षा विमा या योजनेत जाहीर करण्यात आला आहे.२५ पोत्यांच्या खरेदीपर्यंतच ही मोहीम विमा कंपनी राबविणार आहे. ही योजना खरेदीच्या तारखेपासून एक महिन्याने शेतकऱ्यांना लागू होणार आहे. वर्षभरासाठी त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. यामध्ये विमा कंपनीला खत खरेदीची पावती दाखवावी लागणार आहे. खत खरेदीच्या पावतीवरूनच अपघात विम्याची नोंद कंपनी घेणार आहे.यामध्ये अपघाती मृत्यू झाल्यास १०० टक्के रक्कम इफको टोकियो ही विमा कंपनी शेतकऱ्यांना अदा करणार आहे. दोन पाय, दोन डोळे निकामी झाल्यास ५० टक्के रक्कम, एक पाय, एक हात, एक डोळा निकामी झाल्यास २५ टक्के रक्कम कंपनी देणार आहे. रेल्वे, रस्ता, पाण्यात मृत्यू, सर्पदंश, गॅस सिलिंडर स्फोट, इतर कुठलाही अपघात यासाठी ही पॉलिसी शेतकºयांना मदत करणार आहे.पोत्यामागे चार हजारांचा विमाखत कंपन्या एका पोत्यामागे चार हजारांचा सुरक्षा विमा देणार आहे. २५ पोत्यांपर्यंतच हा लाभ मिळणार आहे. जिल्ह्यात २५ पोत्यांपर्यंत खत खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या कमी आहे. मोठे शेतकरीच २५ पोत्यांपर्यंत किंवा जादा खत खरेदी करतात. त्यामुळे ही विमा योजना लहान शेतकऱ्यांसाठी दुधाची तहान ताकावर भागविण्यासारखीच ठरणार आहे.
खत खरेदीसोबत आता शेतकऱ्यांना विमा लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2019 9:17 PM
रूपेश उत्तरवार। लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : रासायनिक खताची खरेदी केल्याने शेतकऱ्यांनाही सुरक्षा विमा मिळणार आहे. त्याकरिता खत कंपनी ...
ठळक मुद्देलाखाची मदत । कंपनी भरणार विमा हप्ता