लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : सुखवस्तू देशांमध्ये आणि विलासी कुटुंबांमध्येच समलिंगी विवाहाची टूम असावी, असा यवतमाळच्या सामान्य माणसाचा समज होता. आपल्या गावात असे घडूच शकत नाही, या भ्रमात असलेल्या यवतमाळकरांना सध्या एका विवाहाने अचंब्यात टाकले आहे. चक्क दोन तरुणांनी एकत्र येत एकमेकांशी विवाह केला. तोही यवतमाळच्या एका नामांकित हॉटेलमध्ये.येथील स्टेट बँक चौकातील हॉटेलच्या परिसरात ३० डिसेंबरच्या रात्री हा समारंभ पार पडला. विशेष म्हणजे, देश विदेशातील निवडक ७०-८० वऱ्हाडी मंडळींना यावेळी मेजवानी देण्यात आली.या लग्नातील उपवर वधू आणि वर हे दोन्ही पुरुषच आहेत. यवतमाळातील एका फोटो स्टुडिओचा वारस या जोडीतील एक आहे. तो गेल्या काही वर्षांपासून कॅलिफोर्नियामध्ये (अमेरिकेत) स्थायिक झाला आहे. तेथील ग्रिनकार्डही त्याला मिळालेले आहे. नामांकित इलेक्ट्रॉनिक कंपनीत तो महत्त्वाच्या पदावर कार्यरत आहे. त्याचे कुटुंबीय मात्र यवतमाळातच आहेत. अमेरिकेत राहणाऱ्या या यवतमाळकर तरुणाला चीनमधील ‘व्हिन’ नामक तरुण आवडला. सुरूवातीला ओळख, नंतर मैत्री आणि शेवटी प्रेम झाले. ही अजब प्रेमकहाणी लग्नबेडीत अडकण्यासाठी सज्ज झाली.आपले आईवडील यवतमाळात आहे म्हणून लग्नही यवतमाळातच करण्याचे ठरले. ३० डिसेंबरला ‘नवरा नवरी’ येथे आले. ‘गेट टू गेदर’ करायचे अशा नावाने हॉटेल बुक करण्यात आले आणि सायंकाळी धुमधडाक्यात लग्न उरकले. या समारंभाला यवतमाळातील क्वचितच कोणी उपस्थित होते. मात्र, अमेरिका, चीनमधून ५०-६० मित्र आले होते. त्यात १० समलिंगी जोडप्यांचाही समावेश होता.दुसºया दिवशी या समलिंगी विवाहाची वार्ता कळताच सर्वसामान्य यवतमाळकरांनी मात्र तोंडात बोटे घातली. तर नवपरिणित दाम्पत्य मात्र मधुचंद्राला निघून गेले. दरम्यान, आमच्या हॉटेलमध्ये फक्त गेट टू गेदर झाले. लग्न झाले का याविषयी माहिती नसल्याचे संबंधित हॉटेलच्या व्यवस्थापकांनी ‘लोकमत’ला सांगितले.आईचा विरोध झुगारलायवतमाळातील या तरुणाच्या अशा समलिंगी विवाहाला त्याच्या आईचा विरोध होता. मात्र, मुलाच्या मर्जीपुढे तिचे काही चालले नाही. लहानपणापासून हुशार असलेला आपला मुलगा आज अमेरिकेत चांगल्या पगाराची नोकरी करतो, एखाद्या सुस्वरुप तरुणीशी त्याचे लग्न लावावे हे आईचे स्वप्न चकनाचूर झाले. शेवटी चीनमधील तरुणाशीच त्याने लग्न केले. लग्नाच्या पूर्वी या समलिंगी जोडप्याने यवतमाळातील चार-पाच प्रतिष्ठितांच्या घरी जाऊन त्यांचे आशीर्वाद घेतल्याचीही चर्चा आहे. हॉटेलमधील समारंभात या समलिंगी जोडप्याला हळद लावून, अंतरपाट धरून रितसर वैदिक पद्धतीने विवाह पार पडला.
यवतमाळात वैदिक पद्धतीने पार पडला आंतरराष्ट्रीय समलिंगी विवाह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 9:55 AM
सुखवस्तू देशांमध्ये आणि विलासी कुटुंबांमध्येच समलिंगी विवाहाची टूम असावी, असा यवतमाळच्या सामान्य माणसाचा समज होता. आपल्या गावात असे घडूच शकत नाही, या भ्रमात असलेल्या यवतमाळकरांना सध्या एका विवाहाने अचंब्यात टाकले आहे.
ठळक मुद्देहॉटेलमधील समारंभात यवतमाळ-चीनच्या तरुणांची लग्नगाठवऱ्हाड्यांमध्ये १० समलिंगी जोडप्यांचा समावेश