विलास गावंडे ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : अगदी लहान वयात बोधिसत्वने कौशल्याची कास धरली. भल्यालभल्यांना जे जमत नाही ते त्याने सहावीत असतानाच करून दाखविले. विशेषत: शेतकऱ्यांचे दु:ख प्रत्यक्ष जाणणाऱ्या या चिमुकल्याने तयारी केलेली सुगम चाळणी शेतकरी महिलांच्या वेदनेवर गुणकारी ठरणारी आहे. अखिल भारतीय साहित्य संमेलनात संमेलनाध्यक्ष अरुणा ढेरे यांच्या हस्ते या चाळणीचे वाटप करण्यात आले. यावेळी बोधिसत्वच्या पाठीवर पडलेली अनेकांची कौतुकाची थाप प्रेरणेला गती देऊन गेली.यवतमाळच्या भोसा परिसरातील ईश्वरनगरात राहणारा बोधिसत्त्व गणेश खंडेराव हा पर्यावरण रक्षणाचा सच्चा साथी आहे. पावसाळ्यात सीडबॉलच्या माध्यमातून त्याने अनेक रोपटी निर्माण केली. त्याला यवतमाळकर जनतेचीही मोठी साथ मिळाली. उपक्रम आणि प्रबोधनाची तळमळ असलेल्या बोधिसत्वने आपल्या कौशल्याला वाव देत ‘सुगम चाळणी’ तयार केली. सुगीच्या दिवसात धान्य साफ करण्यासाठी होणारा त्रास कमी करण्याचे हे यंत्र आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात आपद्ग्रस्त कुटुंबातील ३५ महिलांना या चाळणीचे वाटप करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी बोधिसत्वच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली.सुगीच्या दिवसात त्रास कमीसुगीच्या दिवसात ग्रामीण भागातील महिला धान्य साफ करण्यासाठी चाळणी वापरतात. ही कामे करताना त्यांचे हात गळून जातात, वेदना होतात. बोधिसत्वने तयार केलेले चाळणीयंत्र वेदना आणि थकवा दूर करणारे आहे. या यंत्राद्वारे एका तासात एक ते दोन पोते धान्य सहज साफ करता येतात. सहज आज सोप्या पध्दतीने हाताळता येते. घरातील कुठलाही व्यक्ती हे यंत्र हाताळू शकतो. उपक्रमांमध्ये झोकून देणाºया बोधिसत्वला वडील गणेश आणि आई अमृता यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभते.
चिमुकल्या बोधिसत्त्वने तयार केली सुगम चाळणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2019 12:04 AM
अगदी लहान वयात बोधिसत्वने कौशल्याची कास धरली. भल्यालभल्यांना जे जमत नाही ते त्याने सहावीत असतानाच करून दाखविले. विशेषत: शेतकऱ्यांचे दु:ख प्रत्यक्ष जाणणाºया या चिमुकल्याने तयारी केलेली सुगम चाळणी शेतकरी महिलांच्या वेदनेवर गुणकारी ठरणारी आहे.
ठळक मुद्देशेतकऱ्यांच्या दु:खावर फुंकर : साहित्य संमेलनात अध्यक्षांनी केला गौरव