लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : यवतमाळ शहर व जिल्ह्यात प्रमुख वितरकांनी वैयक्तिक स्वार्थासाठी निर्माण केलेल्या सोयाबीन बियाण्यांच्या कृत्रिम टंचाईची सखोल चौकशी करा, असे आदेश जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी शनिवारी जारी केले.जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर यांच्याकडे ही चौकशी सोपविण्यात आली असून आपण स्वत: या चौकशीवर वॉच ठेवणार असल्याचे जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी ‘लोकमत’ला सांगितले. थेट कंपन्यांकडून कोण्या वितरकाने किती बियाण्यांचे बुकिंग-सौदे केले, दर काय होता याचा लेखाजोखा मागण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत.यवतमाळ शहर व तालुकास्तरावरील प्रमुख सोयाबीन बियाणे वितरकांच्या एकूणच कारभारावर प्रश्नचिन्ह लावले जात आहे. बाजारात बियाण्यांची कृत्रिम टंचाई निर्माण करण्यात आली आहे. ३० किलोच्या बॅगवर ५०० ते ७०० रुपये जास्त घेतले जात आहे. वरून आम्ही ‘एमआरपी’पेक्षा जास्त घेतो काय? असा उलट सवालही शेतकऱ्यांना केला जात आहे. वास्तविक सौदे घेतानाच कंपन्यांशी ‘एमआरपी’ किती राहील याचा ‘सौदा’ही वितरक करतात व त्यांच्या सोईनेच कंपन्या एमआरपी नोंदवितात. याच एमआरपीच्या आड शेतकºयांची आर्थिक पिळवणूक वितरकांकडून केली जाते. या वितरकांचे पांढरकवडा रोड, धामणगाव रोड व अन्य भागातील गोदामे सोयाबीन बियाण्यांनी भरुन आहेत. त्यानंतरही कृत्रिम टंचाई निर्माण केली जात आहे. कंपनीकडून अलॉटमेंट आले नाही, लॉकडाऊनमुळे कंपन्या पेमेंटसाठी साईड देत नाहीत, अशी कारणे सांगून रिटेलरला मागणीच्या अर्धाच माल दिला जात आहे. शेतकºयांनाही अव्वाच्या सव्वा दर सांगून नागविले जात आहे.शेतकऱ्यांनो, घरचेच बियाणे पेरा - एडीओआधीच आर्थिक संकटात असलेल्या शेतकऱ्यांना ५०० ते ७०० रुपये प्रति बॅग जादा दराने बियाणे घ्यावे लागत आहे. कृत्रिम टंचाई हे त्यामागील कारण आहे. त्यामुळे शेतकºयांनी यावेळी घरचेच बियाणे पेरण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे प्रभारी कृषी विकास अधिकारी पंकज बरडे यांनी केले आहे. ‘लोकमत’शी बोलताना बरडे म्हणाले, शेतकऱ्यांनी घरचे बियाणे पेरावे यासाठी कृषी विभागाने मोहीम राबविली आहे. या बियाण्याची उगवण क्षमता ७० टक्के असेल तर एकरी ३० किलो, ६५ टक्के असेल तर ३३ किलो आणि उगवण क्षमता ६० टक्के असेल तर ३६ किलो बियाणे वापरण्याचा सल्ला कृषी विभागाने जिल्हाभरातील शेतकºयांना दिला आहे.बँक स्टेटमेंट तपासा ना !सोयाबीन बियाण्यांच्या प्रमुख वितरकांकडून ‘वास्तव’ दडपले जाण्याची व चौकशी अधिकाºयाची दिशाभूल केली जाण्याची दाट शक्यता आहे. १ नोव्हेंबर २०१९ पासून वितरकांनी बियाणे कंपन्यांशी सौदे-बुकिंग सुरू केले. त्यामुळे या वितरकांचे सर्व बँकांतील खात्यांचे स्टेटमेंट तपासल्यास कोणत्या कंपनीला किती रकमेचा आरटीजीएस झाला, बियाण्याचा भाव काय, बाहेर जिल्ह्यातून किती आरटीजीएस आले आदी मुद्दे स्पष्ट होणार आहे. ५२ ते ५५ रुपये किलोच्या सोयाबीनचा दर ७० ते ९० रुपयापर्यंत कसा गेला हेसुद्धा यातून सिद्ध होण्यास चौकशी अधिकाऱ्याला मदत होईल.खरेदी तीन हजाराने, विक्री नऊ हजाराने !शेतकºयांकडून साडेतीन हजार रुपये दराने सोयाबीन घेऊन प्रमुख वितरक तोच माल आता बियाणे म्हणून खरीपात सात हजार ते साडेनऊ हजार रुपयांपर्यंत शेतकऱ्यांना विकला जात आहे. या सर्व प्रमुख वितरकांना त्यांची जागा दाखविण्यासाठी शेतकऱ्यांनी ‘घरचेच बियाणे वापरणे’ हाच भक्कम पर्याय असल्याचे मानले जाते.
सोयाबीन बियाण्यांच्या कृत्रिम टंचाईची सखोल चौकशी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2020 5:00 AM
यवतमाळ शहर व तालुकास्तरावरील प्रमुख सोयाबीन बियाणे वितरकांच्या एकूणच कारभारावर प्रश्नचिन्ह लावले जात आहे. बाजारात बियाण्यांची कृत्रिम टंचाई निर्माण करण्यात आली आहे. ३० किलोच्या बॅगवर ५०० ते ७०० रुपये जास्त घेतले जात आहे. वरून आम्ही ‘एमआरपी’पेक्षा जास्त घेतो काय? असा उलट सवालही शेतकऱ्यांना केला जात आहे.
ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांचे कृषी अधीक्षकांना आदेश, चौकशीवर स्वत: वॉच ठेवणार, पाळेमुळे खणण्याच्या सूचना