शहरं
Join us  
Trending Stories
1
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
2
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
3
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
4
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
5
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
6
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
7
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
8
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
9
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
10
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
11
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
12
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
13
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
14
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
15
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
16
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
17
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
18
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
19
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
20
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक

राज्यातील १९६ रस्त्यांच्या कामांची तपासणी सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: March 07, 2019 4:33 AM

हायब्रीड अ‍ॅन्युईटी मॉडेल योजनेतून बांधल्या जात असलेल्या रस्त्यांवर पुन्हा दुसऱ्या योजनेतून काम दाखवून परस्पर देयके काढली गेल्याच्या संशया आहे.

- राजेश निस्तानेयवतमाळ : हायब्रीड अ‍ॅन्युईटी मॉडेल योजनेतून बांधल्या जात असलेल्या रस्त्यांवर पुन्हा दुसऱ्या योजनेतून काम दाखवून परस्पर देयके काढली गेल्याच्या संशया आहे. त्यामुळे राज्यभरातील १९६ रस्ते कामांची तपासणी केली जात आहे. याचा अहवाल सार्वजनिक बांधकाम खात्याचे सचिव (रस्ते) चंद्रशेखर जोशी यांनी सर्व मुख्य अभियंत्यांकडून मागितला आहे.राज्यात हायब्रीड अ‍ॅन्युईटी ही महत्वाकांक्षी योजना रस्त्यांसाठी राबविली जात आहे. बिग बजेट कामे व छोटे कंत्राटदार याचा मेळ न बसल्याने अनेक महिने ही योजना थांबली होती. मात्र नंतर कामांचे तुकडे पाडून ही योजना मार्गी लावली गेली. राज्यभरात १९६ ठिकाणी अ‍ॅन्युईटीतून रस्त्यांची कामे केली जात आहेत. परंतु अ‍ॅन्युईटीतून रस्ता बांधला जात असताना त्याच रस्त्यावर केंद्रीय रस्ते निधी, अर्थसंकल्पीय, योजनेत्तर निधी यातूनही रस्ते मंजुरी दाखवून कंत्राटदारांना देयके अदा केली जात असल्याचे धक्कादायक प्रकार पुढे आले. अखेर चंद्रशेखर जोशी यांनी या प्रकाराची खातरजमा करण्यासाठी या १९६ रस्त्यांच्या तपासणीचे आदेश सर्व मुख्य अभियंत्यांना दिले.औरंगाबाद, कोकण,नाशिकात अधिकऔरंगाबाद, कोकण व नाशिक या प्रादेशिक विभागात अशी कामे अधिक संख्येने झाल्याच्या तक्रारी आहेत. त्या अनुषंगाने मुख्य अभियंत्यांकडून तपासणी केली जात आहे.>नकाशे व अंदाजपत्रकांची तपासणीरस्ते कामातील गोंधळ दूर व्हावा म्हणून या सर्व कामांचे नकाशे व अंदाजपत्रक तपासावे. काम रिपीट झाले असेल तर ते नकाशातून वगळावे अशा सूचना दिल्या आहेत. सीआरएफ व अन्य निधीतून देयक मंजूर झाले असेल तर अ‍ॅन्युईटीतून ते मंजूर होणार नाही याची खबरदारी घ्यावी.भविष्यात अशा मोठ्या योजना हाती घेण्यापूर्वी नकाशे व अंदाजपत्रक तयार करण्याच्या वेळीच अन्य योजनेतील सर्व कामांना पूर्णविराम द्यावा व ती कामे बंद करावी, असे निर्देशही सचिव जोशी यांनी दिले आहेत.