शहरं
Join us  
Trending Stories
1
“जो शब्द दिला तो पाळतात, अजित पवार मर्द माणूस”; नवाब मलिकांनी केले तोंडभरून कौतुक
2
काँग्रेसचा प्रचार धडाका! राहुल गांधी, प्रियंका गांधी, खरगेंसह प्रमुख नेते महाराष्ट्रात
3
सौरव गांगुलीचा सल्ला अन् भारताच्या स्टार खेळाडूनं 'निवृत्ती'चा निर्णय बदलला, म्हणाला...
4
बाबा सिद्दिकी यांच्या हत्येबाबत मोठी अपडेट, आरोपींनी आधीच शस्त्रे लपवली होती, पुण्यातून आणखी दोन जणांना अटक
5
कोण आहेत भारतीय वंशाचे कश्यप 'काश' पटेल? डोनाल्ड ट्रम्प यांचे विश्वासू, जे बनू शकतात CIA चीफ!
6
Gold Rates Today : सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी 'गुड न्यूज', जोरदार आपटलाय भाव! पटापट चेक करा 14 ते 24 कॅरेट सोन्याचा लेटेस्ट रेट
7
३५४ मतदार... झोपडीतील मतदान केंद्र...; २० किमी पायपीट करून निरीक्षकांनी केली पाहणी
8
आज दहशतवादी गांधी कुटुंबाची मदत मागताहेत; 'त्या' पत्रावरुन स्मृती इराणींचा हल्लाबोल
9
Shah Rukh Khan : "माझा फोन २ नोव्हेंबरला चोरीला गेला"; शाहरुखला धमकावल्याचा आरोप असलेल्या फैजानचा दावा
10
सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी विचारला घटनात्मक प्रश्न; AI Lawyer दिले ‘असे’ उत्तर, Video व्हायरल
11
"मी एक हिंदू आहे त्यामुळे..."; एकता कपूर असं काय म्हणाली की नेटकऱ्यांनी केला कौतुकाचा वर्षाव
12
अली फजल अन् रिचा चड्डाच्या लेकीचं नाव आलं समोर, अर्थही आहे खूपच खास
13
Truecaller कंपनीवर आयकर विभागाचा छापा, कार्यालयाची घेतली झाडाझडती
14
"145 उमेदवार उभे केले म्हणजे..."; रामदास आठवलेंचा राज ठाकरेंना खोचक टोला
15
"ते खटा-खट म्हणत राहिले, आम्ही महिलांच्या खात्यात पटापट पैसे टाकले"; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांना टोला
16
बंद पडलेल्या जेट एअरवेजची मालमत्ता विकण्याचे आदेश; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
17
"मी राजकारणात आलेलं चाहत्यांना आवडलेलं नाही, पण...", राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर सयाजी शिंदे पहिल्यांदाच बोलले
18
सदाभाऊंची जीभ पुन्हा घसरली; संजय राऊतांना म्हणाले, "कितीही साबण, शाम्पू लावला तरी..."
19
यासीन मलिकच्या पत्नीचं राहुल गांधींना पत्र; "जम्मू काश्मीरातील शांततेसाठी..."
20
इगतपुरी - त्र्यंबकेश्वर मतदारसंघ : चौरंगी लढतीत कोण निवडून येणार राव?

इसापूरचे पाणी पात्रात आलेच नाही

By admin | Published: April 22, 2017 1:47 AM

तालुक्याची जीवनदायिनी असलेली पैनगंगा कोरडी पडली असून या नदी पात्रात पाणी सोडण्यासाठी नागरिकांनी आंदोलने केली.

पैनगंगा कोरडी ठण्ण : उर्ध्व पैनगंगा प्रकल्प अधिकाऱ्यांविरोधात असंतोष उमरखेड : तालुक्याची जीवनदायिनी असलेली पैनगंगा कोरडी पडली असून या नदी पात्रात पाणी सोडण्यासाठी नागरिकांनी आंदोलने केली. इसापूर धरणाचे पाणी सोडण्यातही आले. परंतु उंचवडद परिसरात अद्यापही पाणी पोहोचेल नाही. त्यामुळे परिसरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांविरोधात नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. उमरखेड तालुक्याच्या तीनही बाजूंनी पैनगंगा नदी वाहते. नदी पात्रात पाणी असले की परिसरातील विहिरी आणि हापतपंपाची पाणी पातळी वाढते. मात्र यंदा हिवाळ्यातच पैनगंगा नदी कोरडी पडली. त्यामुळे ४० गावांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली. पैनगंगा नदीचे पाणी नदी पात्रात सोडावे यासाठी आंदोलने करण्यात आली. विशेष म्हणजे नांदेड आणि यवतमाळ जिल्हा प्रशासनाने १५ दलघमी पाणी राखीव ठेवले आहे. त्यातील ११ दलघमी नांदेडच्या कोट्यातील पाणी सोडण्यात आले. परंतु उंचवडद येथील परिसरासाठी पैनगंगा नदी पात्रात पाणी सोडले नाही. पाण्यासाठी येथील नागरिकांनी पैनगंगा नदीच्या पात्रातच चार दिवस उपोषण केले. परंतु प्रशासनाला जाग आली नाही. तीन दलघमी पाणी नदी पात्रात सोडल्यास या परिसराचा पाणी प्रश्न निकाली निघू शकतो. परंतु अद्यापही प्रशासनाने याबाबत कोणतीच उपाययोजना केली नाही. विशेष म्हणजे विदर्भात हा प्रकल्प असला तरी मराठवाड्याला मात्र मुबलक पाणी मिळते. उन्हाळ्यातही असाच दुजाभाव होतो. दोन आठवड्यापूर्वी पैनगंगेचे सोडलेले पाणी मराठवाड्यातील नागरिकांनी अडविले होते. त्यानंतर तहसील प्रशासनाने पोलिसांच्या मदतीने बांध उद्ध्वस्त करण्यात आला. परंतु त्यानंतरही उंचवडदपर्यंत पाणीच पोहोचले नाही. प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी नागरिकांनी आंदोलन केले. उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी त्यावेळी आश्वासन दिले. परंतु अद्यापही या आश्वासनाची पूर्तता झाली नाही. आणि पैनगंगेच्या पात्रात उंचवडद परिसरात पाणी पोहोचले नाही. त्यामुळे या परिसरातील अनेक गावांमध्ये भीषण पाणीटंंचाई निर्माण झाली आहे. माणसांसोबतच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे. एवढी गंभीर परिस्थिती असताना या परिसरातील लोकप्रतिनिधी मात्र कोणताही पवित्रा घेत नाही. उमरखेड तालुक्यातील पैनगंगा नदी तीरावरील गावांसोबतच इतर गावांमध्येही भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. अनेक गावातील नळ योजना अखेरच्या घटका मोजत आहे. तर विहिरींनी तळ गाठला असून हातपंपही बंद पडले आहे. पंचायत समितीने पाणीटंचाईचा कृती आराखडा तयार केला आहे. मात्र त्याची अद्यापही प्रभावी उपाययोजना झाली नाही. त्यामुळे बंदी भागासह तालुक्यातील इतर गावांमध्येही पाणीटंचाईच्या झळा नागरिकांना पोहोचत आहे. अनेकदा भारनियमामुळे कृत्रिम पाणीटंचाई निर्माण होते. उमरखेड तालुक्यातील पाणीटंचाईवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी लोकप्रतिनिधींसह प्रशासनाने पुढाकार घेण्याची गरज आहे. (शहर प्रतिनिधी)