लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : दु:खी, कष्टी, गरीब लोकांच्या समस्या सोडवून त्यांचे जीवन प्रकाशमान करणे हेच लोकप्रतिनिधी म्हणून आपले कर्तव्य आहे. रुग्णसेवेच्या माध्यमातून हे कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडण्याचा प्रयत्न करतो, असे प्रतिपादन महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी येथे केले.२० ते २६ डिसेंबर दरम्यान यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नेत्रशस्त्रक्रिया झालेल्या सर्व रुग्णांची फेरतपासणी शुक्रवारी येथील उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आली. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने, आरोग्यदूत रामेश्वर नाईक, डॉ. रागिनी पारेख, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मनीष श्रीगिरीवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, दारव्हाचे नगराध्यक्ष बबनराव इरवे, पंचायत समिती सभापती उषा चव्हाण, उपसभापती पंडित राठोड, डॉ. मनोज सक्तेपार आदी उपस्थित होते.पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने म्हणाले, मतदारसंघातील गोर, गरीब लोकांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी आर्थिक भुर्दंड बसू नये, त्यांच्यावर नेत्र शस्त्रक्रिया व्हावी, यासाठी ना. संजय राठोड यांनी सातत्याने पाठपुरावा केल्यानेच हे शिबिर यशस्वी झाले. ना. संजय राठोड यांच्या सहकायार्तून भविष्यातही या भागात नेत्र शस्त्रक्रिया शिबिर घेऊ, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांची पुन्हा ४ फेब्रुवारीला दिग्रस, दारव्हा, नेर ग्रामीण रूग्णालयात तपासणी केली जाईल. तेथे डोळे तपासून मोफत चष्मे वितरित करण्यात येणार असल्याचे डॉ. लहाने यांनी यावेळी सांगितले. डॉ. मनीष श्रीगिरीवार, रामेश्वर नाईक यांचीही यावेळी भाषणे झाली. प्रास्ताविक डॉ. तरंगतुषार वारे, संचालन डॉ. भेंडे यांनी केले. याप्रसंगी शिबिरासाठी परिश्रम घेणारे डॉक्टर्स, कर्मचारी यांचा ना. संजय राठोड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. दारव्हा उपजिल्हा रूग्णालयातर्फे डॉ. तात्याराव लहाने यांचा सत्कार करण्यात आला. यशस्वीतेसाठी शिवसेना तालुका प्रमुख मनोज सिंगी, घनश्याम नगराळे, शेखर राठोड, अमित मेहरे आदींनी पुढाकार घेतला.
दु:खितांचे जीवन प्रकाशमान करणे हे कर्तव्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2019 10:20 PM
दु:खी, कष्टी, गरीब लोकांच्या समस्या सोडवून त्यांचे जीवन प्रकाशमान करणे हेच लोकप्रतिनिधी म्हणून आपले कर्तव्य आहे. रुग्णसेवेच्या माध्यमातून हे कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडण्याचा प्रयत्न करतो, असे प्रतिपादन महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी येथे केले.
ठळक मुद्देसंजय राठोड : दारव्हा उपजिल्हा रूग्णालयात नेत्र शस्त्रक्रिया झालेल्यांची फेरतपासणी