शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
4
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
5
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
6
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
7
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
8
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
10
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
11
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
12
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
13
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
14
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
15
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
16
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
17
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
18
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
19
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
20
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप

‘तो’ अपघात नसून खून

By admin | Published: July 21, 2016 12:08 AM

सोमवारी रात्री दहाच्या सुमारास राळेगाव रोडवरील इंदिरा महाविद्यालयाजवळ एका युवकाचा अपघाताने मृत्यू झाल्याची तक्रार नोंदविण्यात आली होती.

दोघे ताब्यात : भावानेच केला खून कळंब : सोमवारी रात्री दहाच्या सुमारास राळेगाव रोडवरील इंदिरा महाविद्यालयाजवळ एका युवकाचा अपघाताने मृत्यू झाल्याची तक्रार नोंदविण्यात आली होती. त्यानुसार वाहन चालकावर गुन्हाही नोंद करण्यात आला. परंतु हा अपघात नसून खुनच असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. उल्लेखनिय म्हणजे क्षुल्लक कारणातून चुलत भावानेच हा खून केल्याचेही स्पष्ट झाले असून पोलिसांनी मुख्य आरोपी व आणखी एकाला ताब्यात घेतले आहे. तालुक्यातील बोरीमहल येथील अजय माणीक खैरकार(२४) असे मृतकाचे नाव आहे. तो रामटेक येथे अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होता. अजय खैरकार याचा चुलतभाऊ रणजित खैरकार याने वाहनाने अजयला धडक दिली. त्यातच त्याचा मृत्यू झाला, अशी तक्रार कळंब पोलिस ठाण्यात दिली. त्यावरुन वाहन चालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे. परंतु मृतक अजयची आई निर्मला यांनी हा अपघात नसून मुलाचा खून असल्याची तक्रार दिली. तक्रारीतून त्यांनी रणजित अण्णाजी खैरकार, अनिकेत दीपक गायकवाड व त्यांच्या नात्यातील एका महिलेवर संशय व्यक्त केला. त्यानुसार पोलिसांनी मंगळवारी रात्री ९ वाजताच्या दरम्यान रणजित खैरकार (३०) व अनीकेत गायकवाड (२२) यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. या प्रकरणातील मुख्य आरोपी रणजीत खैरकार याने गुन्हा कबुल केल्याचे पोलिसांनी सांगितले. अनिकेत गायकवाड याने रणजितनेच अजय खैरकार याला रागाच्या भरात लोखंडी रॉड मारल्याची माहिती पोलिसांना दिली. अजय खैरकार व रणजित खैरकार हे दोघे चुलतभाऊ होते. घटनेच्या दिवशी या तिघांनीही कळंब येथील बीअरबार मध्ये दारु ढोसली. रात्री ९ वाजताच्या दरम्यान मोटारसायकलने ट्रिपलसिट बोरीमहलकडे परतत असताना दोघा भावांत कॉटन मिलजवळ क्षुल्लक कारणावरुन भांडण झाले आणि रॉड डोक्यात हाणला. एका दणक्यात तो रस्त्याच्या कडेला जाऊन पडल्याची माहिती पोलिसांना दिली. (तालुका प्रतिनिधी)