शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

बुलडाण्यात शक्य आहे, तर यवतमाळात का नाही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2018 11:04 PM

लाथ मारीन तिथं पाणी काढीन... ही यवतमाळच्या माणसाची प्रवृत्ती. पण त्याच माणसांच्या घरात सध्या बादलीभर पाणी नाही. आटलेल्या धरणांचे चित्र सध्या कृश माणसाच्या खोबणीत रुतलेल्या खोल शुष्क डोळ्यांसारखे दिसतेय.

ठळक मुद्देधरणांचे खोलीकरण : बुलडाण्यात ‘बीजेएस’चा आदर्श, यवतमाळकरांचे ‘प्रयास’ मात्र थांबले

आॅनलाईन लोकमतयवतमाळ : लाथ मारीन तिथं पाणी काढीन... ही यवतमाळच्या माणसाची प्रवृत्ती. पण त्याच माणसांच्या घरात सध्या बादलीभर पाणी नाही. आटलेल्या धरणांचे चित्र सध्या कृश माणसाच्या खोबणीत रुतलेल्या खोल शुष्क डोळ्यांसारखे दिसतेय. पण ही स्थिती एकट्या यवतमाळातच आहे असे नाही. बुलडाणा जिल्हाही पाण्याविना तगमगतोय. तिथल्या माणसांनी आदळआपट करण्याऐवजी धरणं खोदायला सुरूवात केली आहे. भारतीय जैन संघटनेने त्यासाठी कंबर कसली. बुलडाण्यात सुरू झालेले हे भगीरथ प्रयत्न यवतमाळच्या माणसांनीही का करू नये, असा प्रश्न निर्माण झाला आहे.कुणाच्या पोटात काय आहे, हे जसे कळत नाही. तसे जमिनीच्या गर्भात पाणी आहे की नाही? हे कोण सांगणार? म्हणूनच आकाशातून पडणारे पाणी धरणात साठवून ठेवणे एवढेच आपल्या हाती असते. बुलडाण्यात भारतीय जैन संघटनेने (बीजेएस) तोच वसा घेतला आहे. दुष्काळमुक्त महाराष्ट्र अभियान सुरू करणाºया बीजेएसने यंदा बुलडाणा जिल्ह्यापासून कामाला प्रारंभ केला. वर्षभरात जिल्हा दुष्काळमुक्त करण्यासाठी धरणांच्या खोलीकरणाचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. ४ कोटी क्यूबिक मिटर गाळ काढून किमान ५० हजार एकर जमीन सुपीक करायची आणि सुमारे २८ अब्ज लिटर पाणी साठवणक्षमता निर्माण करायची, हे या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी भारतीय जैन संघटनेने १३४ जेसीबी मशिन, पोकलॅन खरेदी केल्या आहेत.आता हेच प्रयत्न यवतमाळात का नाही, हा प्रश्न खरा आहे. पाण्यासाठी यंदा आकांत सुरू होणार हे ठाऊक असूनही यवतमाळच्या एकाही संस्थेने धरणाच्या खोलीकरणाचा ‘प्रयास’ केला नाही. गेल्यावर्षी पाणी फाउंडेशनसोबत मिळून भारतीय जैन संघटनेने यवतमाळात मोठे काम केले होते. पण यंदा महाराष्ट्रव्यापी कामाची सुरुवात बीजेएसने बुलडाण्यातून केली आहे. बीजेएसकडे यंत्रसामुग्री आहे. इच्छाशक्तीही आहे. मग यवतमाळच्या अन्य सामाजिक संस्थांनी बीजेएसकडे मदत का मागू नये? प्रत्येक काम शासन आणि प्रशासनावरच लोटून सामान्य माणसाला जबाबदारी झटकता येणार नाही. गेल्यावेळी प्रयास संघटनेने निळोणा धरणातील गाळ उपसण्याचे महत्कार्य केले. पण वर्गणी आणि प्रशासकीय सहकार्याविना काम थांबले. तेच काम आता बीजेएसची मदत घेऊन सर्वसामान्य यवतमाळकरांनी सुरू केल्यास पुढची काही वर्षेतरी टंचाई दूर होईल.बुलडाण्यात पाण्यासाठी प्रत्यक्ष काम सुरू झाले आहे. मग यवतमाळातील सामाजिक संस्थांनी असा पुढाकार आतापर्यंत का घेतला नाही? संस्थाच कशाला, सामान्य नागरिकांनीही घराबाहेर पडून रचनात्मक कार्यात हातभार लावायला काय हरकत आहे? बुलडाणा करू शकते तर यवतमाळ का नाही? पाणी हवे असेल तर यावर विचार व्हायलाच हवा आणि कृतीही!बेंबळाचे स्वप्न पाईपलाईनमध्येचनिळोणाने दगा दिल्यामुळे बेंबळा धरणाचे पाणी आणू, असे दिवास्वप्न गेल्या दोन महिन्यांपासून दाखविले जात आहे. मार्च उलटला तरी हे स्वप्न ‘पाईपलाईन’मध्येच अडकले आहे. आता पाण्याविना कासाविस झालेल्या नागरिकांचा धीर सुटू लागलेला आहे. परवा संतापाचा कडेलोट झाला आणि जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयात तोडफोड झाली. ऐनवेळी धावून आलेल्या पोलिसांनी नागरिकांना समज दिली, पाणी नाही देऊ शकले. पाणी पुरविण्याची जबाबदारी असलेले अधिकारी मात्र हवेच्या वेगाने लुप्त झाले.