लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : कोणत्याही सभ्य समाजात सार्वजनिकरित्या दारू पिणे निषिद्ध समजले जाते. मात्र यवतमाळ जिल्ह्यातील अत्यंत दुर्गम मुकुटबन परिसरात सर्रास नियमाची पायमल्ली होताना दिसत आहे. तळीराम अगदी खुले आमपणे सार्वजनिक हॅन्डपम्पवर जाऊन आपला घसा ओला करताना दिसत आहे .
दारू पिणाऱ्यांच्या गर्दीमुळे महिलांसह तरुण युवतीना त्रास होत आहे. पाणी भरण्याकरिता महिलांना तेथे जाणे कठीण झाले आहे. कोरोनामुळे दारू दुकानात केवळ पार्सल सुविधा असल्यामुळे पाणी मिळत नाही. सकाळी 11 वाजेनंतर अवैधरित्या देशी व विदेशी दारू खरेदी करून हँडपम्पवर खुलेआम दारु पिऊन मस्तवाल होऊन डोलणाऱ्यांची संख्या वाढली आहे. मात्र गाव प्रशासन मूग गिळून आहे . या तळीरामांवर कारवाईची मागणी नागरिक करीत आहेत .