मागील महिन्यापासून पावसाची सुरुवात झाली. त्यावेळी कपाशी, सोयाबीन, तूर पिके डोलत होती. शेतकरी आनंदी होते. सोयाबीनला चांगल्या शेंगा व कपाशीने चांगली बोंडे धरली होती. त्यामुळे यावर्षी आपल्याला निश्चितच चांगले उत्पन होईल, असे स्वप्न शेतकरी बघत होते; परंतु सारख्या सुरू असलेल्या पावसाने शेतकऱ्यांचे स्वप्न धुळीस मिसळले आहे.
पावसामुळे बोडांची सड सुरू झाली. प्रत्येक झाडाची दहा ते बारा बोंडे सडलेली दिसत आहेत. त्यामुळे आताच एकरी दोन क्विंटल उत्पन्न कमी झाले आहे. सोयाबीनच्या शेंगांचे सततच्या पावसामुळे दाणे पोचट होत आहेत. शेंगा काळ्या पडल्या आहेत. यामुळे सोयाबीन उत्पन्नातही घट येणार आहे. तुरीची झाडेही पिवळी पडली आहेत. संततधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या नाकीनऊ आले आहेत.
बॉक्स
कृषी विभागाने लक्ष देण्याची गरज
सततच्या पावसामुळे पिकांचे नकसान होत आहे. मात्र, कृषी विभाग अद्याप सुस्त दिसत आहे. सोयाबीनला अंकुर फुटत आहेत. कपाशीवर लाल्या रोगाने आक्रमण केले आहे. त्यामुळे बळीराजा पुरता हवालदिल झाला आहे.