शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

यवतमाळमध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांचं भरपावसात जेलभरो आंदोलन; दोन तास वाहतूक ठप्प

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2017 3:20 PM

आपल्या मानधनवाढीच्या मागणीसाठी अंगणवाडीतार्इंनी यवतमाळच्या बसस्थानक चौकात गुरुवारी दुपारी जेलभरो आंदोलन केले.

यवतमाळ : आपल्या मानधनवाढीच्या मागणीसाठी अंगणवाडीतार्इंनी यवतमाळच्या बसस्थानक चौकात गुरुवारी दुपारी जेलभरो आंदोलन केले. भरपावसातही तार्इंनी बसस्थानक चौकात ठिय्या दिला. यामुळे तब्बल दोन तास वाहतूक ठप्प झाली, तर आंदोलकांच्या मोठ्या संख्येने अटकेसाठी पोलिसांची वाहने अपुरी पडली. विविध घोषणांनी बसस्थानक परिसर दणाणून गेला होता.

मानधनवाढीचा मुद्दा घेऊन अंगणवाडीतार्इंच्या विविध संघटना संपूर्ण राज्यात रस्त्यावर उतरल्या आहे. ११ सप्टेंबरपासून त्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. मात्र शासनाने अद्यापही दखल घेतली नाही. उलट अंगणवाडीचे कामकाज ग्रामपंचायत अथवा आशा स्वयंसेविकेकडे सोपविण्याच्या हालचाली शासनस्तरावर सुरू आहेत. शासनाच्या धोरणाचा निषेध करण्यासाठी गुरुवारी राज्यभर जेलभरो आंदोलन करण्यात आले. यवतमाळ जिल्ह्यातील सोळाही तालुक्यातील अंगणवाडीताई दुपारी १२ वाजता बसस्थानक चौकातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर एकत्र आल्या. त्यानंतर संपूर्ण बसस्थानक चौकात अंगणवाडीतार्इंनी ठिय्या दिला. यामुळे चारही बाजूंची वाहतूक ठप्प झाली. दरम्यान, पावसाची जोरदार सर कोसळली. परंतु एकही अंगणवाडीताई जागांवरून हटायला तयार नव्हती. भरपावसात आंदोलन सुरू ठेवून शासनविरोधी घोषणा देत होत्या. पाऊस ओसरताच पोलिसांनी अंगणवाडीतार्इंना स्थानबद्ध करण्याची कारवाई सुरू केली. मात्र दोनच लॉरी असल्याने स्थानबद्ध करण्यासाठी अनेक येरझारा माराव्या लागल्या. तोपर्यंत बसस्थानक चौकातील वाहतूक ठप्पच होती. मोठ्या संख्येने आलेल्या आंदोलकांना स्थानबद्ध करण्यासाठी पोलिसांचा बराच वेळ गेला.

आंदोलनाचे नेतृत्व उषाताई डंभारे, गुलाब उम्रतकर, रचना जाधव, पल्लवी रामटेके, कांताबाई मोरे, जया सावळकर, प्रणिता राजूरकर, छाया दांडेकर, सविता कट्यारमल, अनिता कुळकर्णी, विजया सांगळे, रेखा लांडे, निर्मला निर्मला मादेरकर, विजया जाधव, रमा गजभार, बेबी मोडक, दिवाकर नागापुरे, संजय भालेराव आदींनी केले.