दारव्हा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा समितीच्यावतीने येथील पंचशीलनगरात डॉ. आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त जल्लोष भीमजयंती सोहळा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. १० ते १४ एप्रिलदरम्यान विविध कार्यक्रम होणार आहे. १० एप्रिलला सायंकाळी ५ वाजता सचिन खंडारे यांच्या हस्ते उद्घाटन होईल. अध्यक्षस्थानी अशोक नाईक राहतील. यावेळी सप्तखंजिरीवादक रामपाल धारकर व संच अमरावती यांचा कार्यक्रम होईल. ११ रोजी महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूलच्यावतीने स्रेहसंमेलन होईल. यावेळी शालेय विद्यार्थ्यांची अभिवादन रॅली व भोजनदानाचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला आर.आर. गवई, डॉ. की.के. पंडित प्रामुख्याने उपस्थित राहतील. त्याचबरोबर अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने ढोंगी बुवा-बाबांचा प्रयोगाव्दारे भंडाफोड व जाहीर व्याख्यान होईल. अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील, माजी नगरसेवक सिद्धार्थ गडपायले यावेळी उपस्थित राहणार आहे. टीव्ही स्टार विक्रम ढवळे, नांदेड यांचा हास्यविनोदाचा कार्यक्रम होईल. १४ एप्रिल रोजी सामूहिक त्रिशरण पंचशील बुद्धवंदना, धम्मध्वजारोहण व मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. (तालुका प्रतिनिधी)
दारव्हा येथे जल्लोष भीमजयंती सोहळा
By admin | Published: April 10, 2016 2:53 AM