शहरं
Join us  
Trending Stories
1
"खाऊन पिऊन बिल उधार ठेवून आले"; दावोस दौऱ्यात CM शिंदेंची १.५८ कोटींची थकबाकी, कंपनीची नोटीस
2
‘त्या’ ९ मंत्र्यांना पक्षात पुन्हा प्रवेश मिळणार नाही; शरद पवारांनी घेतला मोठा निर्णय : देशमुख
3
अबूझमाडच्या जंगलात ३० नक्षल्यांचा खात्मा; घातपाताचा डाव उधळून लावला
4
'पुतण्याचा कौटुंबिक विषय कायमचा संपला' म्हणत आमदार बबनराव शिंदेंची महायुतीला सोडचिठ्ठी
5
हरयाणात भाजपची हॅट् ट्रिक की, काँग्रेसचे होणार पुनरागमन? मतदानाला सुरुवात
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सार्वजनिक क्षेत्रातून प्रशंसा, कौटुंबिक व दांपत्य जीवनात सौख्य लाभेल
7
मंत्रालयात आमदारांच्या जाळीवर उड्या; विधानसभा उपाध्यक्ष झिरवाळांसह आदिवासी आमदारांचा संताप
8
नागपुरी गेट पोलीस स्टेशनवर दगडफेक; पोलीस अधिकारी आणि कर्मचारी जखमी, मोठं नुकसान
9
पुण्यात मित्राला झाडाला बांधून तरुणीवर सामूहिक बलात्कार; तीन नराधमांचा शाेध सुरू
10
राज्यातील अकृषक कर पूर्ण माफ; सरकारचा निर्णयांचा धडाका सुरूच, मंत्रिमंडळ बैठकीत ३३ निर्णय 
11
हावभाव बघूनच एकमेकींना समजून घेतो; शेफालीने सांगितले स्मृतीसोबतच्या ताळमेळीचे रहस्य
12
हार्दिकची १८ कोटींची  पात्रता आहे का? : मूडी
13
राज्यात आज धडाडणार राजकीय तोफा; मोदी वाशिम-ठाण्यात तर राहुल गांधी कोल्हापुरात
14
भारताचा दारुण पराभव, न्यूझीलंडची विजयी सलामी
15
धारावी प्रकल्पातील अनधिकृत बांधकामांसंदर्भात समिती; न्या. दिलीप भोसले अध्यक्ष, सहा सदस्यही नेमले
16
समाज घटकांसाठी महामंडळे; मंत्रिमंडळ बैठकीत जैन, बारी, तेली समाजासाठी महत्त्वाचे निर्णय 
17
पंतप्रधानांच्या डोळ्यात धूळफेक, अपूर्ण योजनेचे उद्घाटन
18
एकीकडे इराण म्हणतोय युद्ध नकोय, दुसरीकडे म्हणतोय इस्रायलवर हल्ले करणारच 
19
मोदींचे ठरले! ९ वर्षांनी पाकच्या दौऱ्यावर जाणार भारताचे परराष्ट्रमंत्री; ‘एससीओ’ परिषदेत हाेणार सहभागी
20
निवडणुकीचे सूर उमटले वाद्यांच्या बाजारात; उलाढाल वाढली, राज्यातील उमेदवारांची खरेदीसाठी धाव 

रोटरीतर्फे १४ जानेवारीपासून ‘एज्युफेस्ट’

By admin | Published: January 10, 2017 1:29 AM

रोटरी क्लब आॅफ यवतमाळ मिडटाऊनतर्फे स्थानिक स्टेट बँक चौक परिसरातील खुल्या जागेत १४, १५

यवतमाळ : रोटरी क्लब आॅफ यवतमाळ मिडटाऊनतर्फे स्थानिक स्टेट बँक चौक परिसरातील खुल्या जागेत १४, १५ व १६ जानेवारी रोजी ‘एज्युफेस्ट-२०१७’चे आयोजन केले आहे. उद्घाटन पालकमंत्री मदन येरावार यांच्या हस्ते होईल. महसूल राज्यमंत्री संजय राठोड, खासदार भावना गवळी, आमदार तानाजी सावंत, सिनेअभिनेत्री सोनाली कुलकर्णी, हिराचंद रतनचंद मुनोत ट्रस्टचे सचिव रमेश मुनोत प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील. एज्युफेस्टमध्ये टेक्निकल बोर्ड आॅफ एज्युकेशनचे सचिव डॉ.ओ.एस. बिहाडे यांचे ‘इंजिनिअरिंग क्षेत्रातील संधी’, अकाऊंटींग अकॅडमीचे संचालक फारूख हक हे ‘कॉमर्स व अकाऊंटींग’, उपजिल्हाधिकारी श्याम मस्के हे स्पर्धा परीक्षेबद्दल तर प्रहार नागपूरच्या संचालिका शिवाली देशपांडे या आर्मीमध्ये असलेल्या संधीबद्दल मार्गदर्शन करतील. विंग कमांडर प्रियदर्शन अय्यर हे एअरफोर्स, प्रसिद्ध मास्टर सेफ विष्णू मनवर हॉटेल उद्योगातील संधी, आॅक्सफोर्ड स्पिकर्स अकॅडमीचे संजय रघटाटे हे संवाद संभाषण कौशल्य, पुणे येथील मुकुल चिमोटे यांचे परदेशातील शैक्षणिक व वैद्यकीय शैक्षणिक क्षेत्रातील संधीविषयी सांगतील. एमटीडीसीचे व्यवस्थापक प्रशांतकुमार यांचे पर्यटन क्षेत्रातील करिअरविषयी मार्गदर्शन होईल. पत्रकारिता आणि मीडियातील संधीविषयी प्रशांत कोरटकर यांचे मार्गदर्शन होणार आहे. भारतीय हवाई दलाचा स्टॉल आणि ‘रोड नॉट टेकन’ हा कार्यक्रमही होणार आहे. विद्यार्थी, पालकांनी याचा लाभ घेण्याची विनंती रोटरी क्लबचे अध्यक्ष विजय शेटे, सचिव अजय भूत, दिलीप हिंडोचा, प्रकल्प सल्लागार जगजितसिंग ओबेराय, जयप्रकाश जाजू, अमित मोर, विक्रमसिंग दालवाला, जाफर सादिक गिलाणी यांनी केले आहे. (वार्ताहर) सोनाली कुलकर्णी येणार ४मराठी चित्रपट अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांचीही एज्युफेस्टला हजेरी लाभणार आहे. विविध विषयांवर त्या मार्गदर्शन करणार आहेत.