लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग शाखेतील अंतिम वर्षाच्या सहा विद्यार्थिनींची औरंगाबाद येथील धूत ट्रान्समिशन या नामांकित कंपनीत निवड झाली आहे. यामध्ये श्वेता अतकरे, प्रियंका काकडे, स्नेहा काकडे, अनुजा देव, सोनाली डोंगरवार, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग शाखेतील ममता बैस या विद्यार्थिनींचा समावेश आहे. पूल कॅम्पस ड्राईव्हमध्ये संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठांतर्गत निवडक इंजिनिअरिंग महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यात जेडीआयईटीच्याही विद्यार्थ्यांचा समावेश होता. निवड प्रक्रियेमध्ये प्री प्लेसमेंट टॉक, जनरल अॅप्टीट्यूड टेस्ट, टेक्नीकल इंटरव्ह्यू आणि फायनल इंटरव्ह्यूच्या फेऱ्या घेण्यात आल्या. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना कंपनीच्या औरंगाबाद कार्यालयात ग्रॅज्यूएट इंजिनिअर ट्रेनी या पदावर रूजू करून घेतले जाणार आहे.
‘जेडीआयईटी’च्या विद्यार्थिनी औरंगाबादच्या कंपनीत
By admin | Published: June 26, 2017 12:50 AM