लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या टेक्सटाईल इंजिनिअरिंग विभागातील अंतिम वर्षाच्या दोन विद्यार्थ्यांची अमरावती येथील शाम इंडोफॅब प्रा.लि. या नामांकित कंपनीत निवड झाली आहे. टेक्सटाईल उद्योग क्षेत्रात ही कंपनी महत्त्वाची समजली जाते.या कंपनीतर्फे ‘जेडीआयईटी’च्या विद्यार्थ्यांसाठी आॅफ कॅम्पस इंटरव्ह्यू घेण्यात आला. यात टेक्सटाईल इंजिनिअरिंग शाखेतील अंतिम वर्षाचे विद्यार्थी सहभागी झाले होते. सर्वप्रथम टेक्निकल टेस्ट घेण्यात आली. मुलाखतीद्वारे अंतिम निवड झाली. यामध्ये वैष्णवी कुबडे, मृणाल डहाके यांचा समावेश आहे.कंपनीतर्फे शाम इंडोफॅबचे तांत्रिक सल्लागार प्रवीण ठोंबरे, सचिन गिरगावकर, ह्यूमन रिसोर्स मॅनेजर भूवन माथूर हे कॅम्पससाठी उपस्थित होते. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना मॅनेजमेंट इंजिनिअर ट्रेनी या पदावर नियुक्ती देण्यात आली आहे. त्यांना कंपनीतर्फे १.८० लाख रुपयांचे वार्षिक पॅकेज घोषित करण्यात आले आहे.
‘जेडीआयईटी’च्या विद्यार्थ्यांची शाम इंडोफॅबमध्ये निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 10:12 PM