ऑनलाईन लोकमतयवतमाळ : येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विविध शाखेतील अंतिम वर्षाच्या ३९ विद्यार्थ्यांची इंदोर येथील वेज्टूकॅपीटल प्रा.लि. या नामांकित कंपनीत निवड झाली आहे.या कंपनीच्या पूल कॅम्पस ड्राईव्हमध्ये जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयातील सर्व शाखेच्या पात्र विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. सर्वप्रथम ग्रुप डिस्कशन, एचआर व टेक्नीकल इंटरव्ह्यूच्या फेºया घेण्यात आल्या. निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग शाखेतून चिराग पांडे, विक्की भालतिलक, आधिश गोसावी, वृषभ राजबिंडे, पवन पोटे, दर्पण दीक्षित, शेख गुलाम अब्बास शेख, धनंजय खंजीर, अजिंक्य अहेरकर, आकाश पांडे, मयूर दुधे, शेख अर्शद शेख नईम, अतिब असलम शेख, सुमित शुक्ला, कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग शाखेतून अश्विनी बोरा, आनंद शर्मा, गरिमा चुडिवाले, साक्षी समदूरकर, प्रियंका कावळे, शिवानी बिहाडे, ऋषिकेश व्यास, चयन जोगानी, पूजा उपलेंचवार, सर्वेश चौधरी, श्रेयश वगारे, आशितोष मुंगसे, केमिकल इंजिनिअरिंग शाखेतून यश साहू, संजय कोठारी, आयूष मेश्राम, निहाल बेले, प्रियंका निमजे, सिव्हील इंजिनिअरिंग शाखेतून सांकेत कोल्हे, अझर नासीर खान, अश्विनी खोब्रागडे, ऐश्वर्या गोटेकर, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी शाखेतून अयुरी लिमजे, अजिंक्य बनकर, इलेक्ट्रॉनिक्स व टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग शाखेतील नीलेश्वरी सोळंके, दिशा राजगुरे यांचा समावेश आहे.कंपनीतर्फे या विद्यार्थ्यांना बिझनेस अॅनालिस्ट या पदावर कंपनीच्या इंदोर येथील कार्यालयात रुजू केले जाणार आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना तीन लाख ४५ हजार रुपये प्रतीवर्ष एवढे पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. कॅम्पस इंटरव्ह्यूसाठी कंपनीच्यावतीने एचआर मॅनेजर प्रगती तिवारी, सिनिअर बिझनेस अॅनालिस्ट वृषभ बिश्त उपस्थित होते.वेज्टूकॅपीटल ही जागतिक स्तरावरील शेअर बाजार व कमोडिटी मार्केटमध्ये संशोधन करणारी अग्रगण्य कंपनी आहे. ग्राहकांना बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (बीएसई), नॅशनल स्टॉक एक्सचेंज (एनएसई), मल्टी कमोडिटी एक्सचेंज (एमसीई), नॅशनल कमोडिटी अँड डेरिव्हेटिव्ह एक्सचेंज (एनसीडीई) ज्यामध्ये इक्विटी, डेरेव्हेटिव्ह, फ्यूचर अँड आॅप्शन्स, फॉरेन एक्सचेंज, बॉन्ड्स अँड डिबेंचर्स, धातू, कृषी, आॅईल अँड गॅस संबंधित वस्तूंचे ट्रेडिंग व तत्सम सेवा पुरविली जाते. आपल्या ग्राहकांना या प्रचंड चढ-उतार असणाऱ्या मार्केटमध्ये सदैव अग्रेसर ठेवण्यासाठी आणि त्यांची इन्व्हेस्टमेंट सोपी व सुलभ करण्यासाठी कंपनी आपल्या इन्व्हेस्टरला मार्गदर्शन करते. यामध्ये टेक्नीकल व फंडामेंटल अॅनालिसीस, सांख्यिकी विश्लेषण आदी सेवा उपलब्ध असतात.
‘जेडीआयईटी’चे ३९ विद्यार्थी इंदोरच्या कंपनीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2018 11:30 PM