आॅनलाईन लोकमतयवतमाळ : येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्रा. सचिन अरुणराव अस्वार यांना व्हीआयटी युनिव्हर्सिटी वेल्लोर कॅम्पस (तामिळनाडू) ने केमेस्ट्री विषयात आचार्य पदवी जाहीर केली आहे. दीक्षांत समारंभात त्यांना या पदवीने सन्मानित केले जाणार आहे.प्रा. अस्वार यांनी ‘फॅब्रिकेशन अॅन्ड कॅरॅक्टरिझशन आॅफ कायटोसॅन बेस्ड कंपॉजिट अॅन्ड देयर इन्व्हॉयरमेंटल अॅप्लिकेशन’ याविषयावर संशोधन कार्य पूर्ण केले. यासाठी त्यांना व्हीआयटी युनिव्हर्सिटीचे पर्यवेक्षक डॉ.पुंडलिक भगत यांचे मार्गदर्शन लाभले. याविषयावर त्यांनी विविध आंतरराष्टÑीय परिषदेत व नामांकित आंतरराष्टÑीय जर्नलमध्ये शोधनिबंध प्रसिद्ध केले आहे. ते आयएसटीई, आयएईएनजी अशा नामांकित आंतरराष्टÑीय संस्थेचे आजीवन सदस्य आहे.प्रा.अस्वार यांच्या संशोधन कार्याचा १०८ संशोधकांनी संदर्भ म्हणून उपयोग केला आहे. त्यांचा गुगल स्कॉलर एच. इंडेक्स पाच व आई. इंडेक्स चार आहे. याचा फायदा या क्षेत्रात काम करणाºया संशोधकांना होणार आहे. त्यांच्या यशाचे संस्थेचे अध्यक्ष देवेंद्र दर्डा, सचिव किशोर दर्डा, प्राचार्य डॉ. अविनाश कोल्हटकर आदींनी कौतुक केले.
‘जेडीआयईटी’चे सचिन अस्वार यांना पीएच.डी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2018 10:52 PM